Pakistan: इफ्तार पार्टीत आजी-माजी पंतप्रधानांचे समर्थक भिडले, हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2022 02:54 PM2022-04-15T14:54:45+5:302022-04-15T14:55:00+5:30
Pakistan: इम्रान खान यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर मुस्लिम लीग (नवाझ)चे नेते शाहबाज शरीफ नवे पंतप्रधान झाले.
इस्लामाबाद:पाकिस्तानात आलेल्या राजकीय भूकंपानंतर तेहरीक-ए-इन्साफ(PTI)चे अध्यक्ष इम्रान खान यांना पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यांच्या जागी पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाझ) (PML-N) नेते शाहबाज शरीफ यांची पाकिस्तानचे पंतप्रधान झाले. त्यानंतर आता या दोन्ही नेत्यांच्या समर्थकांध्ये वाद झाल्याचे पाहायला मिळत आहेत.
افطاری کرتے ہوئے آوازیں کسنے اور بدتمیزی کرنے پر مصطفی نواز کھوکھر اور نور عالم غصے میں آگئے،،
— Waseem Abbasi (@Wabbasi007) April 12, 2022
یہ ہم لوگوں کو کیا سکھا رہے ہیں؟؟ pic.twitter.com/W9SrPbYG6A
सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ आणि पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाज)च्या समर्थकांमध्ये जोरदार हाणामारी झालेली पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ एका इफ्तार पार्टीतील असल्याचे सांगण्यात येत आहे. रमजानच्या पवित्र महिन्यात देशातील मोठ्या दोन पक्षांचे नेते अशा प्रकारे लढताना पाहून पाकिस्तानातील जनता आश्चर्य व्यक्त करत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये लोक अन्नपदार्थ फेकतानाही दिसत आहेत.
शाहबाज शरीफ बनले नवे पंतप्रधान
अनेक महिनाभरापासून पाकिस्तानात सुरू असलेल्या राजकीय संघर्षाचा 10 एप्रिल रोजी अंत झाला. पीएमएल-एन प्रमुख शाहबाज शरीफ हे पाकिस्तानचे नवे पंतप्रधान झाले. शरीफ यांनी 174 मते घेऊन इम्रान खान यांच्या पक्षाचे उमेदवार शाह मोहम्मद कुरैशी यांना मात दिली.