Pakistan Imran Khan : “मला विषाचं इंजेक्शन देऊन मारतील,” अटकेनंतर इम्रान खान यांनी न्यायालयात व्यक्त केली भीती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2023 09:23 PM2023-05-10T21:23:29+5:302023-05-10T21:24:20+5:30

इम्रान खान यांना बुधवारी विशेष न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी त्यांनी न्यायाधीशांसमोर भीती व्यक्त केली.

Pakistan Imran Khan fears will kill him poison injecting said in court political crisis arrest | Pakistan Imran Khan : “मला विषाचं इंजेक्शन देऊन मारतील,” अटकेनंतर इम्रान खान यांनी न्यायालयात व्यक्त केली भीती

Pakistan Imran Khan : “मला विषाचं इंजेक्शन देऊन मारतील,” अटकेनंतर इम्रान खान यांनी न्यायालयात व्यक्त केली भीती

googlenewsNext

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी आपल्या हत्येची भीती व्यक्त केली आहे. मंगळवारी इस्लामाबाद उच्च न्यायालयातून अटक करण्यात आलेल्या इम्रान खान यांना बुधवारी विशेष न्यायालयात हजर करण्यात आलं. या ठिकाणी नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरोनं इम्रान खान यांची १४ दिवसांची कोठडी मागितली, त्यावर न्यायालयानं आपला निर्णय राखून ठेवला आहे. दरम्यान, इम्रान खान यांनी कोर्टात खळबळजनक दावा केला. माझ्या हत्येचा कट रचला जात असल्याचं त्यांनी सांगितलं. आपल्याला विषाचं इंजेक्शन देऊन हळूहळू मारलं जाऊ शकतं, अशी भीती त्यांनी न्यायालयासमोर व्यक्त केली.

दरम्यान, इम्रान खान यांच्या पीटीआयचे नेते शेख रशीद यांनीही यापूर्वी इम्रान खान यांची हत्या होऊ शकते अशी भीती व्यक्त केली होती. दरम्यान, इम्रान खान यांच्याकडून भीती व्यक्त केल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी इम्रान खान ड्रामा करत असल्याचं म्हटलं. बुधवारी इम्रान खान यांना इस्लामाबाद पोलीस लाईनमध्येच स्थापन करण्यात आलेल्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आलं. दरम्यान नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरोनं जमीन घोटाळ्याप्रकरणी इम्रान खान यांची चौकशी करण्यासाठी १४ दिवसांची कोठडी आवश्यक असल्याचं न्यायालयासमोर सांगितलं.

यावर झालेल्या सुनावणीनंतर न्यायालयानं निर्णय राखून ठेवला. यादरम्यान इम्रान खान समर्थक नेत्यांवरही कारवाई करण्यात आली. इम्रान खान यांच्या पक्षाचे नेते असद उमर यांनादेखील पोलिसांनी अटक केली. तर दुसरीकडे शाह महमूद कुरैशी यांनीदेखील आपल्याला अटक करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं म्हटलं. तसंच त्यांनी उमर यांच्या अटकेच्या वृत्ताला दुजोराही देत आपण सुरक्षित स्थळी आल्याचंही सांगितलं.

Web Title: Pakistan Imran Khan fears will kill him poison injecting said in court political crisis arrest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.