इम्रान खान यांच्या अडचणीत वाढ; निवडणूक आयोगाने जारी केले अटक वॉरंट, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2023 09:29 AM2023-01-11T09:29:35+5:302023-01-11T09:30:22+5:30

Imran Khan : इम्रान खान यांनी ऑगस्ट 2022 मध्ये इस्लामाबादमध्ये एका रॅलीदरम्यान एका महिला न्यायाधीशाविरोधात वादग्रस्त वक्तव्य केले होते.

pakistan imran khan problems increased pakistan election commission issued bailable arrest warrant | इम्रान खान यांच्या अडचणीत वाढ; निवडणूक आयोगाने जारी केले अटक वॉरंट, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

इम्रान खान यांच्या अडचणीत वाढ; निवडणूक आयोगाने जारी केले अटक वॉरंट, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

googlenewsNext

इस्लामाबाद : पाकिस्तानचे (Pakistan) माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफचे (PTI) नेते इम्रान खान (Imran Khan) यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने (ECP) मंगळवारी इम्रान खान आणि त्यांच्या पक्षाचे इतर सदस्य फवाद चौधरी आणि असद उमर यांच्याविरुद्ध निवडणूक आयोगाचा अवमान आणि न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल जामीनपात्र अटक वॉरंट जारी केले.

पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, इम्रान खान यांनी ऑगस्ट 2022 मध्ये इस्लामाबादमध्ये एका रॅलीदरम्यान एका महिला न्यायाधीशाविरोधात वादग्रस्त वक्तव्य केले होते. याशिवाय, त्यांनी रॅलीत उच्च पोलीस अधिकारी, निवडणूक आयोग आणि त्यांच्या राजकीय विरोधकांवरही भाष्य केले. तसेच,इम्रान खान यांनी अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश जेबा चौधरी यांच्यावरही वादग्रस्त टिप्पणी केली होती.

दरम्यान, रॅलीतील भाषणानंतर काही तासांनी पोलीस आणि न्यायव्यवस्थेला धमकावल्याप्रकरणी इम्रान खान यांच्यावर दहशतवादविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता निसार दुर्रानी यांच्या अध्यक्षतेखालील पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाच्या चार सदस्यीय खंडपीठाने इम्रान खान आणि त्यांचे जवळचे सहकारी फवाद चौधरी आणि असद उमर यांच्या विरोधात वॉरंट जारी केले आहे. वॉरंटशिवाय प्रत्येक व्यक्तीला 50 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

दुसरीकडे, पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफचे नेते असद उमर यांनी ट्विट करत निवडणूक आयोगावर हल्ला चढवला आहे. "निवडणूक आयोगाने इम्रान खान, फवाद चौधरी आणि माझ्याविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. स्वत: निवडणुका घेण्याऐवजी ते या कामांमध्ये गुंतले आहेत. ते स्वत: न्यायालयाच्या अवमानासाठी दोषी आहेत'' , असे असद उमरने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. 

याचबरोबर, असद उमर यांनी जामीनपात्र वॉरंट जारी करण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय हा उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा 'अपमान' असल्याचेही म्हटले आहे. दरम्यान, इम्रान खान यांनी पाकिस्तान निवडणूक आयोगाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी अनेकदा केली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त निष्पक्ष भूमिका बजावण्यात पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी अनेकदा केला आहे.

Web Title: pakistan imran khan problems increased pakistan election commission issued bailable arrest warrant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.