पाकिस्तान सरकार पीटीआय नेत्यांवर अत्याचार करतंय, इम्रान खान यांचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2023 10:41 PM2023-05-24T22:41:03+5:302023-05-24T22:41:33+5:30
सर्व नेत्यांनी पक्ष सोडला तरी ज्यांना आम्ही तिकीट देऊ तेच जिंकतील, असा दावा इम्रान खान यांनी केला.
लाहोर : पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफच्या (पीटीआय) दोन प्रमुख नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. यानंतर दबावामुळे पीटीआय नेते आपला पक्ष सोडत आहेत, असा आरोप पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पीटीआय पक्षप्रमुख इम्रान खान यांनी बुधवारी केला. यासोबतच एक दिवस काळाचे चाके फिरणार असल्याचा इशाराही त्यांनी सरकारला दिला आणि सर्व नेत्यांनी पक्ष सोडला तरी ज्यांना आम्ही तिकीट देऊ तेच जिंकतील, असा दावा इम्रान खान यांनी केला.
इम्रान खान यांनी बुधवारी संध्याकाळी देशाला उद्देशून व्हिडिओ संदेश जारी केला. त्यात ते म्हणाले, "सोशल मीडियावर नियंत्रण ठेवण्यासाठी माझ्या घरातील इंटरनेट बंद करण्यात आले आहे. मी तुमच्या लोकांशी चर्चा राहण्याचा प्रयत्न करत राहीन." 9 मे रोजी इम्रान खानच्या अटकेनंतर देशव्यापी हिंसाचारानंतर पीटीआय नेत्यांवर कारवाई करण्यात येत आहे. याचा संदर्भ देत पीटीआय पक्षप्रमुख इम्रान खान म्हणाले, "ही अशी कारवाई आहे जी पाकिस्तानमध्ये यापूर्वी कधीही घडली नव्हती. आमच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना अटक केली जात आहे."
यासोबतच तुम्ही पीटीआयमध्ये असेपर्यंत तुमच्यावर कारवाई केली जाईल असे या नेत्यांना सांगण्यात येत आहे. पीटीआय सोडल्यानंतर तुमच्यावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही, असा आरोप इम्रान खान यांनी सरकारवर केला. याचबरोबर, इम्रान खान यांनी पीटीआय नेत्यांवर केलेल्या कारवाईवर प्रश्न उपस्थित करत म्हणाले की, "गुन्हेगारीने कधी आयडिया मारली जाऊ शकते का? संपूर्ण एजन्सी त्यांना मदत करत आहे, तरीही ते निवडणुकीपासून का पळत आहेत.'' तसेच, त्यांनी दावा केला की, "राजकीय पक्षांची तेव्हाच संपते, जेव्हा त्यांची व्होट बँक संपते. जनतेने आपला निर्णय घेतला आहे. सर्व नेत्यांनी पक्ष सोडला तर ज्यांना आम्ही तिकीट देऊ तेच विजयी होतील."
"पीटीआय नेत्यांनी अंडरग्राऊंड राहावे"
इम्रान खान म्हणाले, "मी माझ्या सर्व लोकांना, कार्यालयातील कर्मचारी, पक्षाचे अधिकारी आणि अडचणीत असलेल्या सर्वांना अंडरग्राऊंड राहण्यास सांगितले आहे. जर यामुळे तुम्हाला मदत मिळत असेल तर, स्वतःला हायलाइट करू नका." याशिवाय, पीटीआय नेत्यांवरील आरोपांचा बचाव करताना इम्रान खान म्हणाले, "शिरीन मजारी या सर्वात देशभक्त पाकिस्तानी आहेत. त्या जीव देतील, पण देशाविरुद्ध काहीही करणार नाहीत. इम्रान रयाझ यांना कोर्टात हजर करण्यावरून त्यांच्यावर इतका अत्याचार केल्याचे कोर्ट वारंवार सांगत आहे, की त्यांना आजतागायत कोर्टात हजर केले गेले नाही."