Pakistan: पाकिस्तानमधील इम्रान खान सरकार कोसळले, विरोधकांनी पंतप्रधानपदासाठी बड्या नेत्याचे नाव निश्चित केले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2022 05:39 AM2022-04-10T05:39:26+5:302022-04-10T05:40:32+5:30
Pakistan No Confidence Motion: पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव पारित झाला असून, अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने १७४ मते पडली. त्यामुळे अविश्वास प्रस्तावाचा सामना करून पंतप्रधानपद सोडावे लागणारे इम्रान खान पहिले पंतप्रधान ठरले आहेत.
इस्लामाबाद - पाकिस्तानमध्ये रात्रभरात नाट्यमय घडामोडी घडल्या असून, सुप्रिम कोर्टाने नॅशनल असेंब्ली पुन्हा स्थापित केल्यानंतर पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव पारित झाला असून, अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने १७४ मते पडली. त्यामुळे अविश्वास प्रस्तावाचा सामना करून पंतप्रधानपद सोडावे लागणारे इम्रान खान पहिले पंतप्रधान ठरले आहेत. दरम्यान, विरोधी पक्षांकडून नवे पंतप्रधान म्हणून नवाझ शरीफ यांचे बंधू शाहबाज शरीफ यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
174 members have recorded their votes in favour of the resolution. The no-confidence motion against Prime Minister Imran Khan has been passed in the Pakistan National Assembly. pic.twitter.com/wwZoZcwS9A
— ANI (@ANI) April 9, 2022
पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने नॅशनल असेंब्ली बरखास्त करण्याचा राष्ट्रपतींचा निर्णय फिरवत सभागृह पुन्हा स्थापित केल्यानंतर विरोधकांकडून आणण्यात आलेल्या अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरू झाली. सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यावर विरोधी पक्षातील नेते शाहबाझ खान यांनी सभागृहाच्या अध्यक्षांना अविश्वास प्रस्तावावर मतदान घेण्याचे आणि घटनेसोबत उभे राहण्याचा आवाहन केले. त्यानंतर परराष्ट्रमंत्री शाह मोहम्ंमद कुरेशी यांनी इम्रान खान सरकारची बाजू मांडताना विरोधी पक्षांवर परकीय शक्तींसोबत मिळून कट रचल्याचा आरोप केला. त्यानंतर सभागृहात पुन्हा गोंधळ झाला. मात्र अखेरीस मतदान होऊन त्यात इम्रान खान सरकारचा पराभव झाला.
Prayers of crores of Pakistanis have been accepted by the almighty. All members of the united opposition are thankful to Allah: PML (N) leader Shahbaz Sharif in Pakistan National Assembly after the no-confidence motion against Imran Khan was passed
— ANI (@ANI) April 9, 2022
(Pic Source: PTV) pic.twitter.com/l1a4x1wSUo
सरकार पडण्याचे संकेत मिळू लागल्यावर इम्रान खान यांनी पंतप्रधानांचे निवासस्थान सोडले आणि ते इस्लामाबादेतील आपल्या खासगी निवासस्थानी गेले. त्यानंतर नवे पंतप्रधान म्हणून विरोधी पक्षांचे नेते आणि पीएमएल-एन चे नेते शाहबाझ शरीफ यांचे नाव निश्चित झाले आहे. इम्रान खान सरकारविरोधात विरोधाचे नेतृत्व त्यांनीच केले होते.