Pakistan Economic Crisis: पाकिस्तानच्या अडचणीत भर! गॅस पाईपलाईनसाठी १८ अरब डॉलरचा दंड होऊ शकतो

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2023 12:44 PM2023-03-03T12:44:27+5:302023-03-03T12:47:12+5:30

Pakistan Economic Crisis: काही महिन्यांपासून पाकिस्तान आर्थिक अडचणीत सापडला आहे. पीठ, डाळ, तेल यासारख्या वस्तुंचे दर गगनाला भिडले आहेत.

pakistan iran gas pipeline project timeframe agreement could face whopping | Pakistan Economic Crisis: पाकिस्तानच्या अडचणीत भर! गॅस पाईपलाईनसाठी १८ अरब डॉलरचा दंड होऊ शकतो

Pakistan Economic Crisis: पाकिस्तानच्या अडचणीत भर! गॅस पाईपलाईनसाठी १८ अरब डॉलरचा दंड होऊ शकतो

googlenewsNext

Pakistan Economic Crisis:  काही महिन्यांपासून पाकिस्तान आर्थिक अडचणीत सापडला आहे. पीठ, डाळ, तेल यासारख्या वस्तुंचे दर गगनाला भिडले आहेत. इराणसोबतचा गॅस पाईपलाईन प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण न केल्याबद्दल पाकिस्तानला १८ अमेरिकन अब्जचा दंड होऊ शकतो. पाकिस्तानच्या संसदेच्या लोकलेखा समितीच्या बैठकीत यावर चर्चा झाली. पाकिस्तान संसदेच्या लोकलेखा समितीची बुधवारी सभापती नूर आलम खान यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली, ज्यामध्ये इराणमधून गॅस आयात करण्यासाठी पाइपलाइन बांधण्यासह तीन गॅस प्रकल्पांवर चर्चा करण्यात आली. या प्रकल्पांसाठी चार अब्ज डॉलर्सचा निधी जमा झाल्याचे सांगण्यात आले. 

'निधी पडून आहे आणि प्रकल्प रखडले आहेत. इराणसोबतचा गॅस पाइपलाइन प्रकल्प वेळेत पूर्ण न झाल्यास पाकिस्तानला दंड भरावा लागू शकतो, पीएसी सदस्य सय्यद हुसैन तारिक यांनी  असा इशारा त्यांनी दिला आहे. पाकिस्तानने इराण गॅस पाइपलाइन प्रकल्पाबाबत अमेरिकेशी चर्चा केली आहे.

"जेव्हा दहशतवाद्यांनी माझ्याकडे पाहिले..."; राहुल गांधींनी सांगितला किस्सा

इरानमधून गॅस आयात करण्यासंदर्भात प्रतिबंध आहे आणि पाकिस्तान याला खरेदी करु शकत नाही. याशिवाय पाकिस्तान, तुर्कस्तान, भारत तसेच पाइपलाइन प्रकल्पातील सुरक्षेच्या प्रश्नांवर प्रकाश टाकला.

इराण गॅस पाइपलाइन वेळेवर पूर्ण न केल्याबद्दल पाकिस्तानला किती दंड ठोठावला जाऊ शकतो, असा सवाल समितीच्या सदस्यांनी केला. हा दंड 18 डॉलर अब्ज असू शकतो. अमेरिकन राजदूताला एकतर त्याला प्रकल्पासाठी पुढे जाण्याची परवानगी द्यावी किंवा दंड भरण्यासाठी पैसे द्यावेत असे सांगितले आहे. 

Web Title: pakistan iran gas pipeline project timeframe agreement could face whopping

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.