पाकिस्तान भीक मागतोय अन् भारत पोहोचला चंद्रावर; माजी पंतप्रधान नवाज शरीफांचे उद्गार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2023 06:35 AM2023-09-20T06:35:11+5:302023-09-20T06:35:45+5:30

पाकचे पंतप्रधान सध्या विविध देशांकडे पैशांची भीक मागत आहेत

Pakistan is begging and India reaches the moon; Sayings of former Prime Minister Nawaz Sharif | पाकिस्तान भीक मागतोय अन् भारत पोहोचला चंद्रावर; माजी पंतप्रधान नवाज शरीफांचे उद्गार

पाकिस्तान भीक मागतोय अन् भारत पोहोचला चंद्रावर; माजी पंतप्रधान नवाज शरीफांचे उद्गार

googlenewsNext

लाहोर - पाकिस्तान जगाकडे पैशांची भीक मागत आहे, तर भारत चंद्रावर जाऊन पोहोचला. भारताने दिल्लीत नुकतेच जी-२० बैठकीचे आयोजनही केले, असे उद्गार पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी काढले. पाकिस्तानच्या आर्थिक दुरवस्थेला तेथील माजी लष्करशहा व न्यायाधीश जबाबदार असल्याचा आरोप शरीफ यांनी केला.

पाकिस्तानातून परागंदा झालेले नवाज शरीफ गेली काही वर्षे इंग्लंडमध्ये वास्तव्य करून आहेत. त्यांनी सांगितले की, पाकचे पंतप्रधान सध्या विविध देशांकडे पैशांची भीक मागत आहेत, तर भारत चंद्रावर जाऊन पोहोचला आहे. जी- २० ची बैठकही त्याने भरविली. भारतासारखे यश पाकिस्तान का मिळवू शकला नाही? या स्थितीला कोण जबाबदार आहे? असा सवालही शरीफ यांनी विचारला. लाहोर येथे पाकिस्तान मुस्लीम लीग- नवाज (पीएमएल-एन) या पक्षाच्या सभेत व्हिडीओ लिंकच्या माध्यमातून शरीफ यांनी सोमवारी भाषण केले. नवाज शरीफ येत्या २१ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानला परतणार आहेत.

Web Title: Pakistan is begging and India reaches the moon; Sayings of former Prime Minister Nawaz Sharif

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.