Afghanistan: जेव्हा ISI चीफ म्हणालेला, 'अमेरिकेला अमेरिकेच्याच मदतीने अफगाणिस्तानमध्ये हरवणार'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2021 12:49 PM2021-08-17T12:49:15+5:302021-08-17T13:01:01+5:30

Pakistan interest in Taliban, Afghanistan: तालिबानच्या या कृत्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचे बोलले जात आहे. पाकिस्तानातून तालिबानला प्रशिक्षण, हत्यारे पुरविण्यात आली आहेत.

Pakistan ISI chief Hamid Gul told once, will fall down America by America's help on Afghanistan Crisis goes viral | Afghanistan: जेव्हा ISI चीफ म्हणालेला, 'अमेरिकेला अमेरिकेच्याच मदतीने अफगाणिस्तानमध्ये हरवणार'

Afghanistan: जेव्हा ISI चीफ म्हणालेला, 'अमेरिकेला अमेरिकेच्याच मदतीने अफगाणिस्तानमध्ये हरवणार'

googlenewsNext

काबुल : जवळपास तीन दशकांपूर्वी सोव्हिएत संघाने अफगानिस्तान  (Afghanistan) सोडले होते. यामागे मोठा हात हा मुजाहिद्दीन दहशतवादी संघटनेचा होता. या संघटनेने तेव्हा अमेरिका, ब्रिटनसारख्या देशांच्या मदतीने सोव्हिएतला अफगानिस्तानातून हाकलले होते. पुढे जाऊन मुजाहिदीनच्या कमांडरने तालिबान (Taliban) उभे केले, याच तालिबानने अमेरिकेला हतबल केले आहे. (Pakistan ISI's Ex chief satetment on Afghanistan, america goes viral.)

Afghanistan crisis: अफगानिस्तानसाठी भारत सरकारची मोठी घोषणा; ताबडतोब ई-व्हिसा मिळणार

तालिबानच्या या कृत्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचे बोलले जात आहे. पाकिस्तानातून तालिबानला प्रशिक्षण, हत्यारे पुरविण्यात आली आहेत. पाकिस्तानची कुख्यात गुप्तहेर संघटना आयएसआयचे माजी प्रमुख हामिद गुल यांनी एका कार्यक्रमात उघडपणे एक वाक्य बोलले होते. तो व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

Afghanistan: अमेरिकेला एकच चूक नडली; तालिबानच्या मास्टरमाईंड बरादरला 2018 मध्ये सोडले तिथेच फसले

सोव्हिएत संघाला अफगानिस्तानातून बाहेर काढण्यासाठी मुजाहिदीन संघटनेला अमेरिकेने मोठा पाठिंबा दिला होता. याच मुजाहिदीनचा कमांडर पश्तून आदिवासी समाजाचा सदस्य मुल्ला मोहम्मद उमर हा बनला. त्याने पुढे जाऊन त्याच्या नातेवाईकांसोबत मिळून तालिबानची स्थापना केली. मुजाहिदीन अफगान नागरिकांविरोधात असल्याने, तिरस्कार करत असल्याने तालिबानने 1995 पासून तालिबान ताब्यात घेण्यास सुरुवात केली. यानंतर तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बुरहानुद्दीन रब्बानी यांना खूर्चीवरून उतरवले, रब्बानी हे मुजाहिदीनचे संस्थापकांपैकी एक होते. 

Afghanistan: तालिबानींनी जत्रा भरवली! काबुल मिळताच पार्कमध्ये घुसले, मौजमस्ती सुरु; Video व्हायरल

तेव्हाही मुजाहिदीनना अमेरिकेसह पाकिस्तानचे समर्थन होते. ISI चीफ हामिद गुल यांना मुजाहिदीनांना सोव्हिएत विरोधात ताकद देण्यासाठी जबाबदार धरले जाते. आता त्यांचाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ 2014 मधील आहे. यामध्ये त्यांनी हसत हसत ISI ने अमेरिकेला अमेरिकेच्या मदतीने हरविण्याचे वक्तव्य केले होते. हमीद गुल यांचा सहा वर्षांपूर्वी मृत्यू झाला आहे. तरी देखील त्यांचे हे वक्तव्य अफगानिस्तानातील आजच्या परिस्थितीचे संकेत देत असल्याचे दिसत आहे. 

राष्ट्राध्यक्ष गनी यांनी काबुवासियांच्या जिवाचा हवाला देत पलायन केले. यानंतर लढाईच जवळपास संपल्याने तालिबानचे दहशतवादी काबुलच्या एम्यूजमेंट पार्कमध्ये मौजमस्ती करताना दिसले. याचे व्हिडीओ  (Taliban Video) व्हायरल झाले आहेत. एम्यूजमेंट पार्कमध्ये तालिबानींचे मस्ती करतानाचे दोन व्हिडीओ समोर आले आहेत. या व्हिडीओत तालिबानी हातात बंदुका घेऊन गो कार्टिंग करताना दिसत आहेत. दुसऱ्या व्हिडीओत हे तालिबानी घोड्यांवर (खेळण्यातल्या) बसून मौजमस्ती करताना दिसत आहेत. 

 

Web Title: Pakistan ISI chief Hamid Gul told once, will fall down America by America's help on Afghanistan Crisis goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.