इम्रान खान यांना इस्लामाबाद हायकोर्टाचा झटका; अटक वैध ठरवली, लष्कराची कारवाई योग्य!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2023 11:38 PM2023-05-09T23:38:50+5:302023-05-09T23:40:04+5:30

Imran Khan Arrest: इम्रान खान यांना अटक करण्यात आल्यानंतर समर्थकांनी आक्रमक होत आंदोलन सुरू केले आहे.

pakistan islamabad high court terms imran khan arrest as legal | इम्रान खान यांना इस्लामाबाद हायकोर्टाचा झटका; अटक वैध ठरवली, लष्कराची कारवाई योग्य!

इम्रान खान यांना इस्लामाबाद हायकोर्टाचा झटका; अटक वैध ठरवली, लष्कराची कारवाई योग्य!

googlenewsNext

Imran Khan Arrest: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (PTI) पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांना अटक करण्यात आली. इम्रान खान यांच्या अटकेनंतर संपूर्ण पाकिस्तानात तणावाचे वातावरण आहे. तसेच कलम १४४ लागू करण्यात आले आहे. यातच इस्लामाबाद उच्च न्यायालयाने इम्रान खान यांना झटका देत अटक वैध असल्याचे म्हटले आहे. तसेत पाक रेंजर्सची पद्धत योग्य असल्याचे स्पष्ट केले आहे. 

इम्रान खान यांना अटक होताच समर्थक आक्रमक झाले. आंदोलकांनी पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयच्या मुख्यालयावरही हल्ला केला. आदोलकांनी रेडियो पाकिस्तानच्या पेशावरमधील इमरातीलाही आग लावली. यानंतर तेथील परिस्थिती अतिशय तणावपूर्ण झाल्याचे सांगितले जात आहे. 

प्रायव्हेट स्कूल बंद, इंटरनेट प्रभावित

पाकिस्तानात सुरू झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रायव्हेट स्कूल बंद करण्यात आली आहे. तसेच इंटरनेट सेवा ठप्प झाल्या आहेत. काही ठिकाणी इंटरनेट अतिशय धीम्या गतीने सुरू आहे तर काही ठिकाणी सेवा बंद आहेत. आंदोलनकर्ते आणि पोलिसांमध्ये उडालेल्या चकमकीत ५ पोलीस जखमी झाले आहेत. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सीमेवर अलर्ट जारी करण्यात आला असून, सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. आंदोलक पाकिस्तानी लष्कराचे कोअर कमांडर यांच्या घरातही शिरले. तर दुसरीकडे इम्रान खान यांच्या समर्थकांनी रावळपरिंडीतील लष्कराच्या मुख्यालयावरही हल्ला केला. 

खिडकीच्या काचा फोडून कोर्ट रुममध्ये शिरले अन् इम्रान खान यांना पकडून नेले

पाकिस्तानी निमलष्करी दलाकडून इस्लामाबाद उच्च न्यायालयातूनच अटक करण्यात आली. पाकिस्तानच्या इस्लामाबाद उच्च न्यायालयातून इम्रान यांच्या अटकेचे व्हिडिओ समोर आले. यात पाक रेंजर्स माजी पंतप्रधानांना धक्का देत कारमध्ये बसवताना दिसत आहेत.

दरम्यान, इस्लामाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आमिर फारूक यांनी पीटीआयचे नेते फवाद चौधरी, सैफुल्ला नियाजी, फैसल चौधरी, नईम हैदर, अली बुखारी यांना अटकेपासून संरक्षण दिले आहे. 
 

Web Title: pakistan islamabad high court terms imran khan arrest as legal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.