Pakistan: खेळाडूंच्या सुरक्षेसाठी आलेल्या पोलिसांनी खाल्ली तब्बल 27 लाख रुपयांची बिर्यानी, आता कोण भरणार बिल?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2021 02:54 PM2021-09-21T14:54:54+5:302021-09-21T14:59:45+5:30

Pakistan News: न्यूझीलंड संघ 18 वर्षानंतर पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेला होता. पण, सुरक्षेच्या कारणास्तव दौरा रद्द करण्यात आला.

Pakistan: Islamabad Police eat Rs 27 Lakh Biryani | Pakistan: खेळाडूंच्या सुरक्षेसाठी आलेल्या पोलिसांनी खाल्ली तब्बल 27 लाख रुपयांची बिर्यानी, आता कोण भरणार बिल?

Pakistan: खेळाडूंच्या सुरक्षेसाठी आलेल्या पोलिसांनी खाल्ली तब्बल 27 लाख रुपयांची बिर्यानी, आता कोण भरणार बिल?

Next

इस्लामाबाद:पाकिस्तानवर ओडवलेलं आर्थिक संकट जगापासून लपलेलं नाही. देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी पंतप्रधान इम्रान खान शर्तीचे प्रयत्न करत आहेत, पण समस्या जैसे थे आहे. अशातच आता परदेशी क्रिकेट संघाच्या दौऱ्याची सुरक्षा पाहणाऱ्या पोलिसांनी तब्बल 27 लाख रुपयांची बिर्याणी खाल्ल्याची माहिती समोर आली आहे. 

पाकिस्तानी मीडिया हाऊस 24NewHDTV च्या वेबसाईटवर प्रसिद्ध बातमीनुसार, इस्लामाबाद पोलिसांनी एका आठवड्यात 27 लाख रुपयांची बिर्याणी खाल्ली आहे. या प्रकरणाचा खुलासा तेव्हा झाला, जेव्हा खाण्याचे बिल मंजूर करण्यासाठी अर्थ विभागाकडे पाठवण्यात आलं. पण, तपासादरम्यान एवढी मोठी रक्कम दिसल्यानंतर अर्थ विभागानं हे बिल अद्याप पास केलेलं नाही. या प्रकरणाचा तपास सध्या अर्थविभाग करत आहे.

न्यूझीलंडचा पाकिस्तान दौरा रद्द
न्यूझीलंड संघ 18 वर्षानंतर पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेला होता. पाकिस्तानसोबत न्यूझीलंड 3 एकदिवसीय आणि 5 टी -20 आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका खेळणार होता. पण, 17 सप्टेंबरला होणाऱ्या पहिल्या सामन्याच्या दिवशीच न्यूझीलंडकडून सुरक्षेच्या कारणास्तव दौरा रद्द करण्यात आला.
 

Web Title: Pakistan: Islamabad Police eat Rs 27 Lakh Biryani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.