पाकचा कांगावा सुरूच; म्हणे ‘ते’ ड्रोन भारताचेच

By admin | Published: July 29, 2015 02:01 AM2015-07-29T02:01:55+5:302015-07-29T02:01:55+5:30

पंजाबमधील दहशतवादी हल्ल्यात पाकचा हात असल्याचे निष्पन्न होत असतानाच पाकिस्तानच्या उलट्या बोंबा सुरूच असून, पाकने सीमेवर पाडलेले ड्रोन आपले नसल्याचा खुलासा

Pakistan kangawa kicks off; They say 'they' drones are from India only | पाकचा कांगावा सुरूच; म्हणे ‘ते’ ड्रोन भारताचेच

पाकचा कांगावा सुरूच; म्हणे ‘ते’ ड्रोन भारताचेच

Next

इस्लामाबाद : पंजाबमधील दहशतवादी हल्ल्यात पाकचा हात असल्याचे निष्पन्न होत असतानाच पाकिस्तानच्या उलट्या बोंबा सुरूच असून, पाकने सीमेवर पाडलेले ड्रोन आपले नसल्याचा खुलासा पुराव्यासहित भारताने केला असला, तरीही पाक अजूनही हे ड्रोन भारताचेच असल्याचा दावा करत आहे. फोरेन्सिक पुराव्यावरून १५ जुलै रोजी पाक सैनिकांनी पाडलेले ड्रोन भारताचेच असल्याचे दिसत असून, भारतीय सैन्याने ते उडविले आहे, असे पाकने म्हटले आहे.
पाकिस्तानी सैन्याकडून सोमवारी या ड्रोनसंदर्भात दिलेल्या माहितीनुसार ड्रोनसंदर्भातील छायाचित्रावरून हे ड्रोन भारतीय चौकीवरून उडवलेले दिसत आहे. प्रथम ते एलओसीच्या जवळ होते, नंतर एलओसी क्रॉस करून पाकच्या हद्दीत आले व पाकिस्तानी चौक ीचा फोटो घेतला. पाकिस्तानी लष्कराने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार पाक लष्कराने १५ जुलै रोजी एलओसीवर भारतीय ड्रोन पाडले. पाकिस्तानी लष्कराने या ड्रोनसंदर्भात चित्रफीतही प्रसिद्ध केली आहे.
(वृत्तसंस्था)

Web Title: Pakistan kangawa kicks off; They say 'they' drones are from India only

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.