Karachi Blast : कराचीत मोठा स्फोट, 11 जण ठार; अनेक जण ढिगाऱ्याखाली दबल्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2021 05:32 PM2021-12-18T17:32:54+5:302021-12-18T17:33:35+5:30

घटनास्थळी ढिगाऱ्या खाली अनेक जण अडकल्याचे वृत्त आहे. हा ढिगारा हटविण्यासाठी स्थानिक लोकही सहकार्य करत आहेत. स्थानिक प्रशासन, पोलिस दल आणि सिंध रेंजर्सदेखील तपास करण्यात व्यस्त आहेत.

Pakistan Karachi blast 11 killed and 12 injured in shershah area  | Karachi Blast : कराचीत मोठा स्फोट, 11 जण ठार; अनेक जण ढिगाऱ्याखाली दबल्याची शक्यता

Karachi Blast : कराचीत मोठा स्फोट, 11 जण ठार; अनेक जण ढिगाऱ्याखाली दबल्याची शक्यता

Next

इस्लामाबाद - पाकिस्तानातील कराची येथे शनिवारी दुपारी भाषण स्फोट झाला (Karachi blast). यात स्फोटात किमान 11 जणांचा मृत्यू झाल्याचे समजते. कराचीच्या शेरशाह भागातील (shershah Area) परचा चौकाजवळ हा स्फोट झाल्याचे स्थानिक पोलिसांनी म्हटले आहे. स्फोटात जखमी झालेल्या 12 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस अधिकारी जफर अली शाह यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा स्फोट एका खाजगी बँकेच्या खाली असलेल्या नाल्यात झाला. 

बँकेच्या इमारतीचे आणि पेट्रोल पंपाचे मोठे नुकसान -
पोलिसांनी दावा केला आहे, की स्थानिक प्रशासनाने नाला साफ करण्यासाठी नोटीस बजावली होती. मात्र, परिसर खाली न झाल्याने याला विलंब झाला. या स्फोटात बँकेच्या इमारतीचे आणि जवळच असलेल्या पेट्रोल पंपाचे मोठे नुकसान झाले आहे. इमारतीखालील नाल्यात गॅस जमा झाल्याने हा स्फोट झाल्याची शंका पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

बॉम्ब डिस्पोजल स्क्वॅडही घठनास्थळी -
पोलीस प्रवक्त्याने नंतर सांगितले की, बॉम्ब डिस्पोजल पथकालाही घठनास्थळी तपासासाठी पाचारण करण्यात आले. या पथकाने अहवाल दिल्यानंतरच स्फोटाचे निश्चित कारण सांगता येईल. सिंध रेंजर्सनी एका निवेदनात म्हटले आहे की, स्फोटाची माहिती मिळताच, अधिकाऱ्यांनी स्फोटाच्या ठिकाणी धाव घेतली आणि परिसराची घेराबंदी केली. 

याशिवाय, घटनास्थळी ढिगाऱ्या खाली अनेक जण अडकल्याचे वृत्त आहे. हा ढिगारा हटविण्यासाठी स्थानिक लोकही सहकार्य करत आहेत. स्थानिक प्रशासन, पोलिस दल आणि सिंध रेंजर्सदेखील तपास करण्यात व्यस्त आहेत.
 

Web Title: Pakistan Karachi blast 11 killed and 12 injured in shershah area 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.