पाकिस्तान घाबरला! POK मध्ये पेरले भूसुरुंग; आपत्कालीन निविदा केली जारी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2020 02:36 PM2020-05-16T14:36:03+5:302020-05-16T14:42:49+5:30

गेल्या आठवड्यातही पाकिस्तानकडून गिलगिट-बाल्टिस्तान बेकायदेशीररीत्या दल करण्याचा प्रयत्नाविरोधात भारताने  कडक आक्षेप नोंदविला होता. यानंतर आता पाकिस्तान घाबरला असून  पीओकेमध्ये मोठ्या प्रमाणात लष्करी कारवाया सुरू केल्या आहेत.

pakistan laying landmines in pok and issued emergency tender SSS | पाकिस्तान घाबरला! POK मध्ये पेरले भूसुरुंग; आपत्कालीन निविदा केली जारी

पाकिस्तान घाबरला! POK मध्ये पेरले भूसुरुंग; आपत्कालीन निविदा केली जारी

googlenewsNext

पाकव्याप्त काश्मीर प्रश्नावरुन भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव वाढू लागला आहे. गेल्या आठवड्यातही पाकिस्तानकडून गिलगिट-बाल्टिस्तान बेकायदेशीररीत्या दल करण्याचा प्रयत्नाविरोधात भारताने  कडक आक्षेप नोंदविला होता. यानंतर आता पाकिस्तान घाबरला असून  पीओकेमध्ये मोठ्या प्रमाणात लष्करी कारवाया सुरू केल्या आहेत. नियंत्रण रेषेवरील पीओके येथे भूसुरुंग पेरण्याचं काम युद्धपातळीवर सुरू केल्याची माहिती मिळत आहे. यासोबतच पाकिस्तानने अँटी मायनिंग शूजची खरेदी सुरू केली आहे. एका आठवड्यातून हे शूज वितरित करण्यासाठी निविदा देखील काढण्यात आली आहे.

गुप्तचर यंत्रणेशी संबंधित सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी सैन्याने अँटी मायनिंग शूजच्या खरेदीसाठी आपत्कालीन निविदा काढल्या आहेत. 8 मे रोजी सकाळी साडे दहा वाजेपर्यंत निविदा सादर करण्यात आल्या. त्याच दिवशी ती निविदा उघडण्यात आली आणि 15 मेपर्यंत हा माल पुरवण्यास सांगितले गेले आहे. पाकिस्तानी सैन्याने नियंत्रण रेषेजवळ मोठ्या प्रमाणात भूसुरुंग पेरून ठेवले आहेत. 2016 मध्ये झालेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर शेजारच्या देशांकडून आपल्या देशाचा बचाव करण्यासाठी असे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. मात्र आता त्याचा वेग वाढल्याची माहिती मिळत आहे.

ज्या भागात भारताला सहज प्रवेश करता येतो आणि भारतीय सीमेपासून पीओकेचे अंतर हे फारच कमी आहे तिथे पाकिस्तान विशेषत: भूसुरुंग पेरण्याचं काम करत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. यामध्ये राजोरी, पुंछ, बारामुल्ला, बांदीपोरा आणि कुपवाडा जिल्ह्याच्या दुसर्‍या बाजुच्या भागाचा समावेश आहे. या भागातील गस्त सुरू असताना पाकिस्तान आपल्या सैन्याला अँटी मायनिंग शूज देणार आहे जेणेकरून जीवितहानी कमी होईल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये पाक राबवत असलेल्या योजनांना भारताचा विरोध; इम्रान सरकारला दिला गंभीर इशारा

गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये धरण बांधकामासाठी पाकिस्तानने (पाकिस्तान) मोठं कंत्राट दिल्याच्या निर्णयावर भारतानं आक्षेप नोंदविला आहे. भारताच्या (पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या क्षेत्रात) भागात असे प्रकल्प सुरू करणे योग्य नाही. डायमर-भाषा धरणाच्या बांधकामासाठी पाकिस्तान सरकारने चिनी सरकारी कंपनी आणि त्यांच्या सैन्याशी व्यावसायिक हातमिळवणी करत 442 अब्ज रुपयांचा करार केला आहे. भारतानं याला तीव्र शब्दांत आक्षेप घेतला आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव म्हणाले, "जम्मू-काश्मीरचा संपूर्ण प्रदेश आणि केंद्रशासित प्रदेश लडाख हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि कायम राहील, याबाबत आमची भूमिका स्पष्ट आहे. पाकिस्तान आणि चीन यांनी भारतीय हद्दीत अशा प्रकारे सुरू केलेल्या सर्वच प्रकल्पांना आम्ही विरोध दर्शवला आहे आणि चिंता व्यक्त केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! IASच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर अधिकाऱ्याने आक्षेपार्ह फोटो केला पोस्ट; उडाली खळबळ

पृथ्वीराज चव्हाणांच्या 'त्या' विधानानंतर काशी विश्वनाथ मंदिराने घेतला मोठा निर्णय

CoronaVirus News : कोरोनाचा उद्रेक! जगभरात कोरोनाग्रस्तांची संख्या 46 लाखांवर; 3 लाख लोकांचा मृत्यू

CoronaVirus News : बापरे! स्मार्टफोनमुळे पसरू शकतो कोरोना; डॉक्टरांनी दिला थेट 'हा' इशारा

'अणुबॉम्ब टाकायला जातोय...'; नौदलाच्या पायलटने हटके अंदाजात मागितली लग्नासाठी सुट्टी, पत्र व्हायरल

कोरोनाच्या संकटात देशाला 'अम्फान' चक्रीवादळाचा धोका! 'या' राज्यांत मुसळधार पावसाची शक्यता

CoronaVirus News : लॉकडाऊनमध्ये 200 चिमुकल्यांचा वाचवला जीव, रक्ताचं नातं जोडणारा अवलिया

 

Read in English

Web Title: pakistan laying landmines in pok and issued emergency tender SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.