VIDEO: पाकिस्तानातल्या विधानसभेत तुफान राडा; इम्रान खान यांच्या पक्षाचे नेते भिडले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2021 05:03 PM2021-03-02T17:03:12+5:302021-03-02T17:05:34+5:30
सिनेट निवडणुकीवरून पीटीआयच्या नेत्यांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
सिंध: पाकिस्तानातल्या सिंध विधानसभेत तुफान राडा पाहायला मिळाला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या तहरीक-ए-इन्साफ पक्षाचे नेते आपापसात भिडले. बघता बघता परिस्थिती हाताबाहेर गेली. तहरीक-ए-इन्साफच्या नेत्यांनी एकमेकांची खाली पाडून धुलाई केली. सिनेट निवडणुकीवरून हा प्रकार घडला. या फ्री स्टाईल हाणामारीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
सिनेट निवडणुकीत आपण आपल्या मर्जीनुसार मतदान करणार असल्याची घोषणा पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफच्या (पीटीआय) तीन आमदारांनी केली होती. अस्लम आबरो, शहरयार शार आणि करिम बख्श गबोल अशी या आमदारांची नावं आहेत. पीटीआयच्या उमेदवारांना मतदान न करण्याची भूमिका घेतल्यानं पक्षातले इतर नेते या तीन आमदारांवर संतापले. हे तीन आमदार सभागृहात येताच इतर नेत्यांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला.
سندھ اسیمبلی- تماشائے اہل کرم دیکھتے ہیں-#SindhAssemblypic.twitter.com/UpyT6weoTR
— Ashfak Azar (@AshfakA) March 2, 2021
नेते आपापसात भिडल्यानं सभागृहातलं वातावरण तापलं. भांडण सोडवण्यासाठी पीपीपीचे नेते पुढे सरसावले. मात्र तरीही वाद निवळला नाही. हा संपूर्ण प्रकार व्हिडीओत कैद झाला. पीटीआयचे नेते एकमेकांना धक्काबुकी करताना यात दिसत आहेत. एका नेत्याला खालीदेखील पाडण्यात आलं. या दरम्यान सभागृहातले अनेक नेते बाहेर निघून गेले. मात्र तरीही पीटीआच्या आमदारांची धक्काबुकी सुरुच होती.
Scenes when three dissident PTI MPAs attended Sindh Assembly ahead of Senate elections pic.twitter.com/sOZigAHqUA
— Murtaza Ali Shah (@MurtazaViews) March 2, 2021
सिनेट निवडणुकीच्या तिकीट वाटपात मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप आबरो यांनी केला. त्यामुळेच मतदानावेळी पक्षाचा आदेश मानणार नसल्याचं आबरो यांनी जिओ न्यूजला सांगितलं. पीटीआयच्या नेत्यांनी भर सभागृहात घातलेल्या गोंधळाचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.