कर्जाच्या विळख्यात पाकिस्तान; देशवासियांकडून मदतीच्या प्रतिक्षेत इम्रान खान

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2019 10:15 PM2019-06-21T22:15:51+5:302019-06-21T22:17:48+5:30

पाकिस्तानवर वाढत्या कर्जाच्या काळात इम्रान खान पंतप्रधान झाले आहेत.

Pakistan in loan trouble; Imran Khan need help of countrymen | कर्जाच्या विळख्यात पाकिस्तान; देशवासियांकडून मदतीच्या प्रतिक्षेत इम्रान खान

कर्जाच्या विळख्यात पाकिस्तान; देशवासियांकडून मदतीच्या प्रतिक्षेत इम्रान खान

googlenewsNext

इस्लामाबाद : पाकिस्तान दिवाळखोरीकडे वेगात वाटचाल करत असून कर्जाच्या ओझ्याखाली दबला गेला आहे. यामुळे पंतप्रधान इम्रान खान यांनी देशवासियांना उद्देशून संदेश जारी केला आहे. गेल्या 10 वर्षांत पाकिस्तानवरील कर्ज 6 हजारावरून 30 हजार अब्जांवर पोहोचले आहे. यामुळे देशातीस नागरिकांनीच मदत करावी असे आवाहन खान यांनी केले आहे. 


पाकिस्तानवर वाढत्या कर्जाच्या काळात इम्रान खान पंतप्रधान झाले आहेत. अशातच देश दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असताना अमेरिकेनेही मदत थांबविली आहे. यामुळे पाकिस्तानची हालत गंभीर बनली आहे. यामधून बाहेर पडण्यासाठी खान यांनी अधिकाऱ्यांवरील उधळपट्टी, वाहनांवरील खर्च थांबविला होता. तरीही कर्जाच्या मानाने हा खर्च नगण्यच असल्याने शेवटी इम्रान खान यांनी लोकांनाच मदतीचे आवाहन केले आहे. 


पाकिस्तान कर्जाच्या विळख्यात फसण्याचे कारण म्हणजे करचोरी आणि भ्रष्टाचार. आपण कराच्या रुपाने दरवर्षी सरकारी तिजोरीमध्ये 8 हजार अब्ज डॉलर जमा करू शकतो. मात्र, यासाठी मला देशवासियांच्या पाठिंब्याची गरज आहे, असे इम्रान खानने संदेशात म्हटले आहे. 


आम्ही भ्रष्टाचाराला रोखण्यास तयार आहोत. मात्र, करचोरीच्या बाबतील लोकांची मदत लागेल. पाकिस्तान हा एक उदार देश आहे. देशावर आलेल्या संकटांना सामोरे जाण्यासाठी योगदान देण्याचा इतिहास आहे. एफबीआरकडे लोकांच्या मालमत्तांची माहिती आहे. मात्र, लोकांनी त्यांच्या मालमत्तेची माहिती आपणहून दिल्यास चांगले होईल, असे इम्रान खान यांनी सांगितले. 


तसेच इम्रान यांनी त्यांच्या मंत्र्यांनाही साधे राहण्याचे आदेश दिले आहेत. मंत्र्यांनी समाजात वावरताना साधे राहणीमान ठेवावे. देशावर असलेल्या आर्थिक संकटाची जाणीव ठेवावी, असे त्यांनी मंत्र्यांना सांगितले आहे.

Web Title: Pakistan in loan trouble; Imran Khan need help of countrymen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.