बोंबला! दही खरेदी करण्यासाठी ड्रायव्हरने मधेच रोखली ट्रेन, VIDEO व्हायरल झाल्यावर मिळाली शिक्षा!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2021 11:23 AM2021-12-09T11:23:13+5:302021-12-09T11:23:32+5:30
Pakistan Train Driver Video : सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा याच घटनेचा व्हिडीओ असल्याचं सांगितलं जात आहे. व्हिडीओ समोर आल्यावर ट्रेन ड्रायव्हर आणि त्याच्या असिस्टंटला सेवेतून निलंबित करण्यात आलं आहे.
पाकिस्तानमध्ये (Pakistan) एका पॅसेंजर ट्रेनचा ड्रायव्हर एका फारच अजब कारणांसाठी चर्चेत आला आहे. हा ड्रायव्हर ट्रेन चालवत होता, पण तेव्हाच त्याचा दही खाण्याची इच्छा झाली. मग काय मधेच त्याने ट्रेन थांबवली आणि आपल्या असिस्टंटला दही विकत घेण्यासाठी पाठवलं.
सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल (Pakistan Train Driver Video) झाला आहे. हा याच घटनेचा व्हिडीओ असल्याचं सांगितलं जात आहे. व्हिडीओ समोर आल्यावर ट्रेन ड्रायव्हर आणि त्याच्या असिस्टंटला सेवेतून निलंबित करण्यात आलं आहे.
डॉनच्या वृत्तानुसार, रेल्वे मंत्री आजम खान स्वाती यांनी मंगळवारी ट्रेनचा ड्रायव्हर राणा मोहम्मद शहजाद आणि त्याचा असिस्टंट इफ्तिखार हुसैन यांना नोकरीवरून काढलं. ही कारवाई सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यावर करण्यात आली. व्हिडीओत ड्रायव्हरला दही खरेदी करण्यासाठी लाहोरच्या एका रेल्वे स्टेशनजवळ ट्रेन थांबवताना दाखवण्यात आलं.
Inter-city train driver in Lahore gets suspended after making unscheduled stop to pick up some yoghurt.#pakistan#Railway#ViralVideopic.twitter.com/n6csvNXksQ
— Naila Tanveer🦋 (@nailatanveer) December 8, 2021
रेल्वे मंत्री म्हणाले आणि इशारा दिला की, 'मी भविष्यात अशा घटना खपवून घेणार नाही आणि कुणालाही व्यक्तीगत उपयोगासाठी राष्ट्रीय संपत्तीचा उपयोग करण्याची परवानगी नाही'.
सध्या या घटनेवरून पाकिस्तान रेल्वे विभागात गोंधळाचं वातावरण आहे. तर दुसरीकडे पाकिस्तान रेल्वेची सोशल मीडिया यूजर्स खिल्ली उडवत आहेत.
दरम्यान याआधी डिसेंबरमध्ये रेल्वे प्रवासादरम्यान लोकोमोटिव ड्रायव्हर आणि असिस्टंट यांच्या मोबाइल वापरावर बंदी घालण्यात आली आहे. त्यांना ट्रेनमध्ये आपल्या फोनवर सेल्फी घेणे, फोटो काढणे आणि व्हिडीओ रेकॉर्ड करण्यावर बंदी घालण्यात आली होती.