पाकिस्तान सैरभैर, भारतासोबतचे व्यापारी संबंध तोडले, उच्चायुक्तांनाही परत बोलावणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2019 07:55 PM2019-08-07T19:55:57+5:302019-08-07T20:05:25+5:30
बुधवारी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी नॅशनल सिक्युरिटी कमिटीची बैठक बोलविली होती.
इस्लामाबाद : जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 केंद्र सरकारकडून रद्द करण्यात आल्यानंतर पाकिस्तान सैरभैर झाला आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्ताननेभारतासोबतचे द्विपक्षीय व्यापारी संबंध तोडले आहेत. याशिवाय, भारतासोबतचे मुत्सद्दी संबंध सुद्धा डाऊनग्रेड केले आहेत. म्हणजेच, राजकीय संबंधांचा दर्जा कमी केला आहे. याचाच अर्थ पाकिस्तानमधील भारताच्या उच्चायुक्तांना भारतात परत पाठविणार आणि नवी दिल्लीतील आपल्या उच्चायुक्तांना पाकिस्तानमध्ये परत बोलवणार आहे. यानुसार, भारताचे उच्चायुक्त अजय बिसारिया यांना भारतात परत जाण्यास पाकिस्तानने सांगितले आहे.
बुधवारी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी नॅशनल सिक्युरिटी कमिटीची बैठक बोलविली होती. या बैठकीत यासंबंधीचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये भारतासोबत मुत्सद्दी संबंध डाऊनग्रेड केले जातील. याशिवाय, भारतासोबतचे द्विपक्षीय व्यापार संबंध तोडण्यात येतील. तसेच, बैठकीत भारतासोबत द्विपक्षीय संबंध व व्यवस्थांचा (समझौता) आढावा घेतला जाईल आणि हा मुद्दा संयुक्त राष्ट्रात मांडला जाईल. याशिवाय, 5 ऑगस्ट हा भारताचा स्वातंत्र्य दिवस 'काळा दिवस' म्हणून पाकिस्तान साजरा करेल, असाही निर्णय यावेळी घेण्यात आला.
"Pakistan expels Indian envoy, suspends trade over Kashmir: Pakistan govt," reports AFP News Agency pic.twitter.com/TcB0HI1yrb
— ANI (@ANI) August 7, 2019
दरम्यान, जम्मू आणि काश्मीरचे कलम 370 रद्द झाल्याचे पाकिस्तानच्या पंतप्रधानांना सहन झालेले नाही. केंद्र सरकारने या राज्याचा विशेष दर्जा रद्द करत विभाजनही केले आहे. यामुळे धक्का बसलेल्या पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी मंगळवारी विशेष सत्र बोलावले होते. यावेळी इम्रान खान यांनी चुकीच्या शब्दांचा प्रयोग केला आहे.
Pakistan National Security Committee decided to take following actions
— ANI (@ANI) August 7, 2019
1. Downgrading of diplomatic relations with India.
2. Suspension of bilateral trade with India.
3. Review of bilateral arrangements. 2/2 https://t.co/PBj5OA16Rc
पाकिस्तानच्या संसदेत इम्रान खान यांनी भारताने घेतलेल्या निर्णयाचा विरोध केला. तसेच हा मुद्दा आम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, या वेळी त्यांची जीभ घसरली. भारताच्या या पावलामुळे काश्मीरमधील हालत आणखी गंभीर होईल. त्यांनी यापुढे जात भारताने पुलवामासारख्या हल्ल्याला आमंत्रण दिल्याचे म्हटले आहे. तर, इम्रान खान यांच्या सरकारमधील मंत्री फवाद चौधरी यांनी युद्धाची भाषा केली आहे. फवाद चौधरी म्हणाले, 'संसदेत बेकार विषयांवर चर्चा करण्याऐवजी आपल्याला भारताला खून, अश्रू आणि घामाने उत्तर दिले पाहिजे. आम्हाला युद्धासाठी तयार राहायला हवे.'
Pakistan Sources: Government of Pakistan to not send its High Commissioner designate to India who was to take charge later this month. Pakistan may also ask Indian High Commissioner to Pakistan Ajay Bisaria to leave Pakistan pic.twitter.com/Ur0iJl5Xyl
— ANI (@ANI) August 7, 2019