Video - पाकिस्तानच्या सियालकोटमध्ये लष्करी तळावर भीषण स्फोट; आगीचे लोट अन् धुराचं साम्राज्य

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2022 02:19 PM2022-03-20T14:19:54+5:302022-03-20T14:21:12+5:30

Pakistan Massive Explosion : स्फोटांचा आवाज ऐकून लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. 

pakistan massive explosion heard in sialkot cantonment area army ammunition dump on fire | Video - पाकिस्तानच्या सियालकोटमध्ये लष्करी तळावर भीषण स्फोट; आगीचे लोट अन् धुराचं साम्राज्य

Video - पाकिस्तानच्या सियालकोटमध्ये लष्करी तळावर भीषण स्फोट; आगीचे लोट अन् धुराचं साम्राज्य

Next

पाकिस्तानमधील सियालकोट शहरातील लष्कराच्या नियंत्रणाखाली असलेल्या भागात मोठा स्फोट झाल्याची घटना आता समोर आली आहे. आगीचे लोट आणि धुराचं साम्राज्य निर्माण झाले आहे. याचे अनेक धक्कादायक व्हिडीओ देखील समोर आले आहेत. स्फोटांचा आवाज ऐकून लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. 

पाकिस्तानी वृत्तपत्र डेली मिलापचे संपादक रिशी सुरी यांनी याबाबत ट्विट केलं आहे. सियालकोटच्या लष्करी तळावर अनेक स्फोट झाले आहेत. प्राथमिक तपासात हा शस्त्रसाठा ठेवण्यासाठी परिसर असल्याचं समोर आलं आहे. सर्वत्र आगीच्या ज्वाळा दिसत आहेत. यामागचं नेमकं कारणे अद्याप समजू शकलेलं नाही असं ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

सोशल मीडियावर या घटनेचे अनेक व्हिडिओ शेअर होत आहेत. पाकिस्तानच्या सियालकोट शहरात एकापाठोपाठ अनेक वेळा झालेल्या स्फोटांनी संपूर्ण परिसर हादरला होता. लोक घरातून बाहेर आले आणि घटनेची माहिती घेण्यास सुरुवात केली. सियालकोटचा छावणी परिसर हा पाकिस्तानी लष्कराच्या सर्वात जुन्या लष्करी तळांपैकी एक आहे. ते पूर्णपणे शहराला लागून आहे. 1852 मध्ये ते बांधले होते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: pakistan massive explosion heard in sialkot cantonment area army ammunition dump on fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.