Nupur Sharma Row: पाकिस्तानात नुपूर शर्मा यांचं समर्थन, मौलानाने मुस्लीम समाजावरच केले आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2022 03:55 PM2022-06-16T15:55:38+5:302022-06-16T15:59:43+5:30

पाकिस्तानचे मौलाना इंजिनिअर मोहम्मद अली मिर्झा यांनी नुपूर शर्मा यांचे समर्थन करत, मुस्लीम समाजावर आरोप केले आहेत. मौलाना अली म्हणाले, सर्वप्रथम मुस्लीम पॅनलिस्टने नुपूर शर्मा भडकतील अशी विधाने केली. आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपच्या निलंबित प्रवक्त्याने पैगंबरांबद्दल भाष्य केले.

Pakistan maulana muhammad ali mirza comes in support of bjp leader nupur sharma in Prophet row | Nupur Sharma Row: पाकिस्तानात नुपूर शर्मा यांचं समर्थन, मौलानाने मुस्लीम समाजावरच केले आरोप

Nupur Sharma Row: पाकिस्तानात नुपूर शर्मा यांचं समर्थन, मौलानाने मुस्लीम समाजावरच केले आरोप

googlenewsNext

भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर यांच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले होते. तेव्हापासून त्या चर्चेत आहेत. त्यांच्या या वक्तव्यानंतर, मुस्लीम देशांमध्येही नाराजी दिसून आली. या देशांनीही भारताला लक्ष्य केले. नुपूर शर्मा यांच्या विरोधात शेजारील देश पाकिस्तानातही निदर्शने झाली. मात्र यानंतर आता तेथे एका मोलानाने नुपूर शर्मा यांचे समर्थन केले आहे. 

मोहम्‍मद अली मिर्झा यांनी, मुस्लीम समाजावर केले आरोप -
पाकिस्तानचे मौलाना इंजिनिअर मोहम्मद अली मिर्झा यांनी नुपूर शर्मा यांचे समर्थन करत, मुस्लीम समाजावर आरोप केले आहेत. मौलाना अली म्हणाले, सर्वप्रथम मुस्लीम पॅनलिस्टने नुपूर शर्मा भडकतील अशी विधाने केली. आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपच्या निलंबित प्रवक्त्याने पैगंबरांबद्दल भाष्य केले.

मोहम्‍मद अली मिर्झा म्हणाले, पहिली गुन्हेगार तर ती मुस्लीम व्यक्ती आहे, जिने लाइव्ह टीव्हीवर एखाद्याच्या धर्माबद्दल भाष्य केले. ते म्हणाले आपल्याला या वादात संपूर्ण परिस्थिती पाहावी लागेल. नूपूर शर्मा यांच्य वक्तव्यावरून त्या पलटवार करत आहेत, हे स्पष्ट होते. नूपूर शर्मा म्हणाल्या, जर आपण अशा प्रकारे बोलणार असाल, तर आम्हीही असे बोलू शकतो. ते म्हणाले पहिली गुन्हेगार ती मुस्लीम व्यक्ती आहे, जिने कुणाच्या धर्माबद्दल लाइव्ह टीवी प्रोग्राममध्ये भाष्य केले.

मोहम्‍मद अली म्हणाले, आपण कुणाच्याही धर्माची खिल्ली उडवणे, हे कुरानला धरून नाही. दुसऱ्या लोकांसोबत चर्चा करताना आपण आपल्या भाषेवर नियंत्रण ठेवायला हवे आणि अल्‍लाहने आपल्याला हा संदेश दिला आहे. एवढेच नाही, तर नुपूर शर्मा वादात अरब देशांतील लोक एसीमध्ये बसून वातावरण खराब करत आहेत, तर भारतातील लोक भीषण गर्मीत निदर्शने करत आहेत आणि पोलीस त्यांना प्रत्युत्तर देत आहेत, असेही मौलाना अली यांनी म्हटले आहे.
 

Web Title: Pakistan maulana muhammad ali mirza comes in support of bjp leader nupur sharma in Prophet row

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.