Video : 'कोरोना व्हायरस खालूनही येऊ शकतो, पायही प्रोटेक्ट करा', महिला मंत्र्यांचा अजब सल्ला!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 02:27 PM2020-04-21T14:27:51+5:302020-04-21T14:48:58+5:30

पाकिस्तानातील एका महिला मंत्र्यांंनी कोरोना व्हायरसबाबत केेलेल्या अजब वक्तव्याची चर्चा रंगली असून त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Pakistan minister on coronavirus preventive measures said Tange bhi protect ho video goes viral api | Video : 'कोरोना व्हायरस खालूनही येऊ शकतो, पायही प्रोटेक्ट करा', महिला मंत्र्यांचा अजब सल्ला!

Video : 'कोरोना व्हायरस खालूनही येऊ शकतो, पायही प्रोटेक्ट करा', महिला मंत्र्यांचा अजब सल्ला!

Next

कोरोना व्हायरसचा महामारीने साऱ्या जगाला प्रभावित केले आहे. व्हायरसचं संक्रमण रोखण्यासाठी आरोग्य अधिकारी, आरोग्य मंत्री लोकांना सोशल डिस्टंसिंग, हातांची स्वच्छता, स्वच्छता, फेस मास्क आणि हात चेहऱ्याला न लावण्याचा सल्ला देत आहेत. अशात यासंदर्भात पाकिस्तानच्या एका महिला मंत्र्यांचं अजब वक्तव्य सोशल मीडियात व्हायरल झालं आहे.

जगभरात देशात कोरोना रोखण्यासाठी उपायांची व्यवस्थित आखणी आहे. पाकिस्तानच्या पत्रकार नायला इनायत यांनी नुकताच डॉ. फिरदौस अवान यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. अवाय या इमरान खान यांच्या सरकारमध्ये सूचना आणि प्रसारण मंत्री आहेत. 

नायला यांनी व्हिडीओ पोस्ट करताना कॅप्शन दिलंय की, 'फिरदौसचं म्हणणं आहे की व्हायरस खालूनही येऊ शकतो'. महिला मंत्र्यांनीच दिलेल्या या विचित्र सल्ल्यावरून लोक त्यांची चांगलीच खिल्ली उडवत आहेत. कारण त्यांनी जसा सल्ला दिला तसा कुणीही दिलेला नाही. WHO ने सुद्घा असा सल्ला दिलेला नाही.

व्हिडीओत फिरदौस सांगताना दिसत आहे की, 'तुमचं शरीर असो, पाय असो तेही छाकलेले असावेत. फक्त चेहरा प्रोटेक्ट कराल तर व्हायरस खालूनही येईल. असं चालणार नाही. हेही एक मेडिकल सायन्स आहे आणि यासाठी आपल्याला मिळून काम करायचं आहे'.

दरम्यान, पाकिस्तानातही कोरोनाने थैमान घातलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, पंजाब प्रांतात कोरोनाची लागण झालेले रूग्ण सर्वाधिक आहेत. इथे 3,822, सिंधमध्ये 2,537, खैबर-पख्तूनखवामध्ये 1,137, बलूचिस्तानमध्ये 376, गिलगितमध्ये-बाल्टिस्तानमध्ये 257, इस्लामाबादमध्ये 171 पेक्षा जास्त केसेस समोर आल्या आहेत.
 

Web Title: Pakistan minister on coronavirus preventive measures said Tange bhi protect ho video goes viral api

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.