पाकिस्तान जगासाठी सर्वात धोकादायक देश

By admin | Published: February 16, 2017 05:16 PM2017-02-16T17:16:47+5:302017-02-16T17:44:09+5:30

अमेरीकेच्या गुप्तचर संघटनेच्या (सीआयए) माजी आधिकाऱ्याने पाकिस्तान हा जगासाठी सर्वात धोकादायक देश असल्याचे म्हटले आहे.

Pakistan is the most dangerous country for the world | पाकिस्तान जगासाठी सर्वात धोकादायक देश

पाकिस्तान जगासाठी सर्वात धोकादायक देश

Next

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 16 - अमेरीकेच्या गुप्तचर संघटनेच्या (सीआयए) माजी अधिकाऱ्याने पाकिस्तान हा जगासाठी सर्वात धोकादायक देश असल्याचे म्हटले आहे. इस्लामाबाद येथे सीआयएचे माजी अधिकारी केविन हल्बर्ट यांनी पाकिस्तानला इशारा देताना म्हटले की, घसरती अर्थव्यस्था, वाढलेला दहशतवाद यामुळे पाकिस्तान अपयशी होत आहे. पाकिस्तानचे हे अपयश जगाला धोकादायक ठरु शकते.

केविन हल्बर्ट यांनी गुप्तचर समुदायाची वेबसाईट साइफर ब्रीफला दिलेल्या मुलाखतीत पाकिस्तानबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले. या मुलाखतीत ते म्हणाले, पाकिस्तान एक अशा बँकप्रमाणे आहे, जी खूप मोठी होऊ इच्छितो पण अपयशी नाही किंवा एवढी मोठी आहे की तीला कोणी अपयशी नाही होऊ देत. जर पाकिस्तानची अर्थव्यवस्था ढासळली तर त्याचा सर्व जगावर परिणाम होऊ शकतो.

3.3 करोड लोकसंख्या असलेल्या अफगाणिस्तानमध्ये खूप साऱ्या समस्या आहेत. पण अफगाणिस्तानपेक्षा पाच पट जास्त लोकसंख्या असलेल्या पाकिस्तानमध्ये वाढता दहशतवाद, ढासळती अर्थव्यवस्था, तसेच अण्विक शस्त्रासाठा यामुळे त्यांच्या समस्या वाढतचं आहेत. आणि जगाला त्याचा धोका आहे. लोकसंख्या आणि वाढता जन्मदर मध्ये सहाव्या स्थानावर असलेल्या पाकिस्तानसाठी चिंतेचा विषय आहे. पुढे बोलताना हल्बर्ट म्हणाले, सध्या पाकिस्तान धोकादायक देश नसला तरी भविष्यात जगासाठी सर्वात धोकादाक देश बनू शकतो.

Web Title: Pakistan is the most dangerous country for the world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.