भारताचा नाद करायला निघाला! पाकिस्तानी नौदलाची हालत बेकार, दोनच पाणबुड्या कार्यरत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2021 02:34 PM2021-08-12T14:34:30+5:302021-08-12T14:37:17+5:30
Pakistan Navy submarine Issue: पाकिस्तानच्या दोन सबमरीन अगोस्ता ९० बी आणि ए अगोस्ता ७० ही पुढील वर्षाच्या मध्यानंतर सक्रीय होणार आहे. अगोस्ता ७० क्लासची पाणबुडी पीएएस हुरमतच्या इंजिनामध्ये बिघाड आहे. तसेच तिच्या इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सपोर्ट सिस्टिममध्ये देखील समस्या येत आहे. यामुळे हा पाणबुडी गस्तही घालू शकत नाही आणि वेळ पडली तर युद्धही लढ शकत नाही अशा अवस्थेत आहे.
इस्लामाबाद : भारताला टक्कर देण्याच्या मनसुब्याने स्पर्धा करणाऱ्या पाकिस्तानला (Pakistan) आता त्यांच्या नौदलातील युद्धनौका, पाणबुड्यांचा खर्च पेलवेनासा झाला आहे. तांत्रिक बिघाड आणि मेन्टेनन्समुळे नौदलाच्या केवळ दोनच पाणबुड्या कार्यरत आहेत. पाच पैकी तीन अगोस्ता क्लासच्या सबमरीन या एकतर अपग्रेड करण्यात येत आहेत किंवा त्या बिघडलेल्या अवस्थेत आहेत. यामुळे या नौका समुद्रात उतरू शकत नाहीएत. यामुळे आणखी वर्षभर पाकिस्तानला दोनच पाणबुड्यांच्या आधारे काम चालवावे लागणार आहे. (Pakistan navy force left with only two active duty submarines)
पाकिस्तानच्या दोन सबमरीन अगोस्ता ९० बी आणि ए अगोस्ता ७० ही पुढील वर्षाच्या मध्यानंतर सक्रीय होणार आहे. अगोस्ता ७० क्लासची पाणबुडी पीएएस हुरमतच्या इंजिनामध्ये बिघाड आहे. तसेच तिच्या इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सपोर्ट सिस्टिममध्ये देखील समस्या येत आहे. यामुळे ही पाणबुडी गस्तही घालू शकत नाही आणि वेळ पडली तर युद्धही लढ शकत नाही अशा अवस्थेत आहे.
पाकिस्तानची आणखी एक पाणबुडी अगोस्ता ९० बी क्लास पीएनएस साद ही डॉकवर आहे. एप्रिलपासून तिचा मेंटेनन्स केला जात आहे. तर तुर्कस्तानने दिलेली एसटीएम कंपनीच्या पाणबुडी देखील अपडेट केली जात आहे. ही पाणबुडी सी हॅक टॉर्पिडो, बाबर ३ क्रूझ मिसाईल डागण्यासाठी तयार केली जात आहे. तुर्कीची कंपनी पीएनएस खालीद पाणबुडीच्या दुरुस्तीचे काम करत आहे. अशाप्रकारे पाकिस्तानच्या युद्धनौका काही ना काही कारणाने अडकलेल्या आहेत.
पाकिस्तानला चीनने आठवी पाणबुडी दिलेली नाही. यामुळे सध्यातरी पाकिस्तानला काही काळ दोनच पाणबुड्यांवर काम चालवावे लागणार आहे. पीएनएस हश्मत आणि पीएनएस हमजा असे या पाणबुड्यांची नावे आहेत. पाकच्या पाणबुड्याच नाहीत तर युद्धनौकांवर देखील हेच संकट आहे. पीएनएस खैबर एक गायडेड मिसाईल डिस्ट्रॉयर आहे, या युद्धनौकेतून मोठा आवाज येत आहे. यामुळे ही नौकादेखील कामाला जाण्याची शक्यता आहे.