तालिबानविरोधात पाकिस्तानचा नवा प्लॅन; चीन, इराणला भडकवलं, TTP विरोधात मोहिम

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2024 01:57 PM2024-07-24T13:57:28+5:302024-07-24T13:58:08+5:30

२०२१ मध्ये तालिबानी सरकार काबुलमध्ये सत्तेत आल्यानंतर पाकिस्तानसोबत टेन्शन वाढलं आहे.

Pakistan New Plan Against Taliban; provokes to China Iran, campaign against TTP terriost | तालिबानविरोधात पाकिस्तानचा नवा प्लॅन; चीन, इराणला भडकवलं, TTP विरोधात मोहिम

तालिबानविरोधात पाकिस्तानचा नवा प्लॅन; चीन, इराणला भडकवलं, TTP विरोधात मोहिम

इस्लामाबाद - अफगाणिस्तानच्यातालिबान सरकारसमोर सातत्याने नामुष्की ओढावणाऱ्या पाकिस्ताननं आता चीन आणि इराणला भडकवणं सुरू केले आहे. अफगाणिस्तानातील दहशतवादी ना केवळ पाकिस्तानसाठी तर चीन आणि इराणसाठीही धोकादायक आहेत. तालिबाननं अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांवर कारवाई करावी अशी मागणी पाकिस्ताननं केली आहे. तालिबाननं TTP दहशतवाद्यांविरोधात सक्त पाऊलं उचलावी जे पाकिस्तानी सैनिकांची हत्या करत आहेत असं त्यांनी म्हटलं आहे.

अफगाणिस्तानातील पाकिस्तानचे राजदूत आसिफ दुर्रानी म्हणाले की, अफगाणिस्तानच्या धरतीवरील दहशतवादी फक्त पाकिस्तान नव्हे तर चीन, इराण, ताजिकिस्तान आणि उज्बेकिस्तानसाठीही चिंतेचा विषय आहे. पाकिस्तानला अफगाणिस्तानसोबत शांती आणि चांगले संबंध हवेत असं त्यांनी सांगितले. दुर्रानी यांचं हे विधान अलीकडेच खैबर आणि बलूचिस्तानात पाकिस्तानी सैन्यावर झालेल्या हल्ल्यात सैनिकांच्या मृत्यूनंतर आलं आहे. २०२१ मध्ये तालिबानी सरकार काबुलमध्ये सत्तेत आल्यानंतर पाकिस्तानसोबत टेन्शन वाढलं आहे.

मदतीसाठी पाकची चीनकडे विनवणी

पाकिस्तानी सरकारने टीटीपी दहशतवाद्यांविरोधात सैन्य अभियान सुरू केले आहे. त्यामुळे पाकिस्तानात परिस्थितीत चिघळली आहे. खैबूर प्रांतातील पश्तून इथं जनता रस्त्यावर उतरली आहे. बन्नू येथेही जोरदार विरोध प्रदर्शन होत आहे. इतकेच नाही तर पाकिस्तानातून लाखोच्या संख्येने राहणाऱ्या अफगाणी नागरिकांना त्यांच्या देशात पाठवलं जात आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात संबंध ताणले गेले आहेत. सीमेवर तालिबानी सैन्य आणि पाकिस्तानी सैन्यात गोळीबारीही झाली आहे.

अफगाणिस्तानात पर्यटकांची संख्या वाढली

अफगाणिस्तानात तालिबानी शासन आल्यानंतर संपूर्ण जगात दहशत पसरली होती. अफगाणिस्तानात पुन्हा दहशतवाद पसरणार असं बोललं जात होतं. परंतु तालिबानी सरकार आल्यापासून देशात पर्यटकांची संख्या वाढली आहे. २०२१ ते २०२३ या काळात अफगाणिस्तानातील पर्यटन १० पटीने वाढले आहे.  यात चीनी पर्यटकांची संख्या जास्त असल्याने शंका व्यक्त करण्यात येत आहे. मात्र अफगाणिस्तानातील वाढत्या पर्यटनामुळे पाकिस्तान सरकारवर विरोधकांकडून टीका सुरू आहे. 
 

Web Title: Pakistan New Plan Against Taliban; provokes to China Iran, campaign against TTP terriost

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.