पाकिस्तानातील हॉस्पिटलचा अजब कारनामा, बाळाऐवजी आईच्या हाती दिली प्लास्टिकची बाहुली

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2021 02:29 PM2021-11-05T14:29:02+5:302021-11-05T14:31:05+5:30

Pakistan : ही घटना रावळपिंडीच्या होली फॅमिली हॉस्पिटलमधून समोर आली आहे. इथे एका बाळाला हॉस्पिटलमधूनच किडनॅप करण्यात आलं.

Pakistan : Newborn replaced with plastic doll in Rawalpindi hospital by kidnapper | पाकिस्तानातील हॉस्पिटलचा अजब कारनामा, बाळाऐवजी आईच्या हाती दिली प्लास्टिकची बाहुली

पाकिस्तानातील हॉस्पिटलचा अजब कारनामा, बाळाऐवजी आईच्या हाती दिली प्लास्टिकची बाहुली

googlenewsNext

(Image Credit : audacy.com)

भारताचा शेजारील देश पाकिस्तान (Pakistan) नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत राहतो. गरिबी आणि महागाईत देशात उपासमारीची स्थिती निर्माण झाली आहे. तेच या देशात अनेक मुलांच्या किडनॅपिंगच्या केसेसही वाढताना दिसत आहेत. नुकतीच या देशातील वर्षानुवर्षे चालत आलेली कुप्रथा समोर आली होती. ज्यात मन्नतच्या नावावर आई-वडील आपल्या मुलांचा त्याग करतात. अशा मुलांकडून इथे भीक मागवली जाते. आता एक ताजी घटना पाकिस्तानातील एक हॉस्पिटलमधून समोर आली आहे. इथे एका नुकत्याच जन्माला आलेल्या बाळाला किडनॅप करून त्याच्याजागी एक प्लास्टिकची (Newborn Replaced With Plastic Doll) बाहुली ठेवण्यात आली.

ही घटना रावळपिंडीच्या होली फॅमिली हॉस्पिटलमधून समोर आली आहे. इथे एका बाळाला हॉस्पिटलमधूनच किडनॅप करण्यात आलं. किडनॅपरने बाळाच्या जागी प्लास्टिकची बाहुली ठेवली. जेव्हा शुद्धीवर आल्यावर आईने बाळाला बघण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा हॉस्पिटल स्टाफने प्लास्टिकची बाहुली तिच्या कुशीत ठेवली. ARY न्यूजच्या रिपोर्टनुसार, या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. हॉस्पिटलने आपली चूक मान्य करत बाळाचं किडनॅपिंग झाल्याचं मान्य केलं.

हॉस्पिटल प्रबंधनाने या केसमध्ये पोलिसांना संपूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं आहे. ही घटना १ नोव्हेंबरची आहे. ट्विटरवर लोकल मीडिया द्वारे पोस्ट व्हिडीओमध्ये लिहिण्यात आलं की, प्रकरणाची चौकशी वेगाने सुरू आहे. ऑनलाइन व्हायरल झालेल्या व्हिडीओत गर्दी हॉस्पिटलमध्ये गोंधळ घालताना दिसत आहे. आशा केली जात आहे की लवकरच बाळाचा शोध घेतला जाईल.
 

Web Title: Pakistan : Newborn replaced with plastic doll in Rawalpindi hospital by kidnapper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.