Pakistan News: इम्रान खानने मोर्चा काढला तर त्यांना उलटे लटकवू, गृहमंत्र्याची उघड धमकी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2022 04:44 PM2022-10-14T16:44:19+5:302022-10-14T16:45:07+5:30

Pakistan News: इम्रान खान यांना उद्देशून गृहमंत्री म्हणाले की, गर्दीसमोर कोणच्याही सुरक्षेची हमी देऊ शकत नाही.

Pakistan News: If Imran Khan marches, we will hang him upside down, Home Minister's open threat | Pakistan News: इम्रान खानने मोर्चा काढला तर त्यांना उलटे लटकवू, गृहमंत्र्याची उघड धमकी

Pakistan News: इम्रान खानने मोर्चा काढला तर त्यांना उलटे लटकवू, गृहमंत्र्याची उघड धमकी

googlenewsNext

Rana Sanaullah to Imran Khan:पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे सरकार गेल्यापासून, विद्यमान सरकार त्यांच्यावर सातत्याने टीका करत आहे. यातच आता पाकिस्तानचे गृहमंत्री सनाउल्ला खान यांनी इम्रान यांना थेट धमकी दिली आहे. 'इम्रान खान यांनी इस्लामाबादच्या दिशेने लाँग मार्च काढल्यास, सरकार त्यांना उलटे लटकवेल', असा इशारा गृहमंत्र्यांनी दिला आहे. जिओ न्यूजने गृहमंत्र्यांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.

'गर्दीसमोर कोणाच्याही सुरक्षिततेची हमी नाही'
पंतप्रधान शहबाज शरीफ(PM Shehbaz Sharif) यांच्या मंत्र्यांने यावर भर दिला की, सरकार गर्दीसमोर कोणाच्याही जीवाच्या सुरक्षेची हमी देऊ शकत नाही. सशस्त्र जमावाने राजधानीवर हल्ला केल्यास, सरकार एखाद्या व्यक्तीच्या सुरक्षेची हमी कशी देऊ शकेल, असेही मंत्री म्हणाले. जियो न्यूजच्या वृत्तानुसार, राणा सनाउल्लाह यांनी इशारा दिला की, जमावाकडून कोणतीही हिंसक कारवाई झाल्यास पोलीस त्याला प्रत्युत्तर देतील.

धोरण उघड केले नाही
इम्रान खान यांचा पक्ष पीटीआयच्या लाँग मार्चला सामोरे जाण्याची रणनीती सरकारने उघड केलेली नाही, असे मंत्री म्हणाले. राणा सनाउल्लाह यांचे हे वक्तव्य तेव्हा आले आहे, जेव्हा इम्रान खान यांनी म्हटले की पीटीआय त्यांच्या पुढील हालचालीने सरकारला आश्चर्यचकित करेल. दरम्यान, पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचे सल्लागार उमर सर्फराज चीमा म्हणाले की, जर गृहमंत्री राणा सनाउल्ला खान पंजाबमध्ये दाखल झाले तर त्यांना अटक केली जाईल. 

Web Title: Pakistan News: If Imran Khan marches, we will hang him upside down, Home Minister's open threat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.