पाकिस्तानातील पेशावरमधील मशिदीत नमाज सुरू होताच बॉम्बस्फोट, ७० जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2023 03:11 PM2023-01-30T15:11:37+5:302023-01-30T15:14:47+5:30
पाकिस्तानमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. पाकिस्तानमधील पेशावर येथील मशिदीत नमाज पडत असताना बॉम्बस्फोट झाल्याचे समोर आले आहे.
पाकिस्तानमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. पाकिस्तानमधील पेशावर येथील मशिदीत नमाज पडत असताना बॉम्बस्फोट झाल्याचे समोर आले आहे. नमाज सुरू होताच फियादीन याने स्वत:बॉम्बने उडवून घेतले आहे. या घटनेत ७० जण जखमी झाले आहेत. यातील अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना पेशावर पोलीस लाईन जवळ घडली आहे. या बॉम्बस्फोटात मशिदीची भींत पडली आहे.
या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बॉम्बस्फोटानंतर परिसरात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
बॉम्बस्फोटानंतर मशिदीबाहेर अनेकजण मदतीसाठी याचना करत असल्याचे दिसत आहे. स्थनिकांनी लगेचच मदत करण्यास सुरुवात केली आहे. मशिदीमध्ये सर्वजण प्रार्थनेसाठी एकत्र जमल्यानंतर मोठा बॉम्बस्फोट झाला.
Blast inside a mosque in Malik Saad Police Lines #Peshawar, casualties feared. pic.twitter.com/8nzOPYfus7
— Syed Wiqas Shah ترمذی (@SyedWiqasAhmad1) January 30, 2023
मात्र, पेशावरच्या मशिदीत स्फोटाची ही पहिली घटना नाही. यापूर्वी मार्च 2022 मध्ये शिया मशिदीत मोठा स्फोट झाला होता, ज्यामध्ये 57 जणांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यात किमान 200 लोक जखमीही झाले आहेत. पेशावरमधील किस्सा ख्वानी बाजार येथील जामिया मशीद म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रसिद्ध शिया मशिदीत हा स्फोट झाला.
Blast in police lines mosque in #Peshawar, dozen of people injured. pic.twitter.com/TQ0gUcDIV6
— Khurram Iqbal (@khurram143) January 30, 2023