आता भारतासोबत 'बासमती तांदळा'साठी भांडणार पाकिस्तान, असा आहे नवा वाद!

By श्रीकृष्ण अंकुश | Published: October 6, 2020 04:09 PM2020-10-06T16:09:11+5:302020-10-06T16:15:59+5:30

या बैठकीत इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशनचे (आयपीओ पाकिस्तान) सचिव, तांदूळ निर्यातदारांच्या संघटनेचे प्रतिनिधी (REAP) आणि कायदे तज्ज्ञ उपस्थित होते. (Pakistan, )

Pakistan oppose India for GI tag on Basmati rice in European union | आता भारतासोबत 'बासमती तांदळा'साठी भांडणार पाकिस्तान, असा आहे नवा वाद!

आता भारतासोबत 'बासमती तांदळा'साठी भांडणार पाकिस्तान, असा आहे नवा वाद!

Next
ठळक मुद्देपाकिस्तान आता भारतासोबत बासमती तांदळासाठी भाडणार आहे.पाकिस्तान बासमती तांदळाचा मोठा उत्पादक आहे. त्यामुळे भारताचा स्पेशिअॅलिटीचा दावा अयोग्य - पाकिस्तानगंगा नदी आणि हिमालयाच्या मैदानी प्रदेशांत तयार होणाऱ्या बासमती तांदळाचा स्वाद आणि सुगंध जगभरात प्रसिद्ध आहे.

नवी दिल्ली - काश्मीर आणि सीमा वादावरून सातत्याने भारताशी भांडणारा आणि नेहमीच धूळ खाणारा पाकिस्तान आता भारतासोबत बासमती तांदळासाठी भाडणार आहे. आपण युरोपीय यूनियनमध्ये जिओग्राफिकल आयडेंडिफिकेशन (GI) टॅगसाठी भारताच्या दाव्याचा विरोध करणार असल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे. पंतप्रधान इम्रान खान यांचे आर्थिक सल्लागार अब्दुल रजाक दाऊद यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

जिओ न्यूच्या एका वृत्तानुसार, या बैठकीत इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशनचे (आयपीओ पाकिस्तान) सचिव, तांदूळ निर्यातदारांच्या संघटनेचे प्रतिनिधी (REAP) आणि कायदे तज्ज्ञ उपस्थित होते. यावेळी REAPचे सदस्य म्हणाले, पाकिस्तान बासमती तांदळाचा मोठा उत्पादक आहे. त्यामुळे भारताचा स्पेशिअॅलिटीचा दावा अयोग्य आहे. अब्दुल रजाक यांनी स्पष्टपणे म्हटले आहे, की पाकिस्तान ईयूमध्ये भारताच्या या अर्जाला विरोध करेल. 

इम्रान खान यांचे सल्लागार अब्दुल रजाक यांनी REAP आणि इतरांना, बासमती तांदळावर असलेल्या त्यांच्या दाव्याचे संरक्षण केले जाईल, असा विश्वास दिला आहे.  या वृत्तपत्राने म्हटले आहे, की भारताने ईयूमध्ये बासमती तांदळावर संपूर्ण मालकीचा दावा केला आहे. जियो न्यूजने गल्फ न्यूजच्या हवाल्याने म्हटले आहे, की यूरोपीयन रेग्युलेशन 2006नुसार, बासमती तांदळाला सध्या भारत आणि पाकिस्तानच्या उत्पादनाच्या रुपात मान्यता आहे.

गंगा नदी आणि हिमालयाच्या मैदानी प्रदेशांत तयार होणाऱ्या बासमती तांदळाचा स्वाद आणि सुगंध जगभरात प्रसिद्ध आहे. भारताच्या हरियाणा, पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू-काश्मीर आणि पंजाब सारख्या राज्यांत बासमतीची शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. नुकतीच मध्य प्रदेशनेही जीआय टॅगची मागणी केली होती. मात्र, पंजाबसारख्या राज्यांनी याला विरोध केला होता. भारत दरवर्षी जवळपास 33 हजार कोटी रुपयांचा तांदूळ निर्यात करतो.

एखाद्या भागातील उत्पादनाला जीओग्राफिकल इंडिकेशन टॅगमुळे (जीआय टॅग) विशेष ओळख मिळते. चंदेरीची साडी, कांजिवरमची साडी, दार्जिलिंगचा चहा, महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी, जयपूर ब्लू पोटरी, बनारसी साडी, तिरुपतीचे लाडू, मध्य प्रदेशातील झाबुआचे कडकनाथ कोंबडे आणि मलिहाबादी अंब्यांसह आतापर्यंत जवळपास 600हून अधिक भारतीय उत्पादनांना जीआय टॅग मिळालेला आहे.
 

Web Title: Pakistan oppose India for GI tag on Basmati rice in European union

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.