VIDEO : "मोठा भाऊ हा मोठा भाऊच असतो!" भारताची प्रगती पाहून पाकिस्तानी म्हणाले, देश पॉवरफुल...;

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2023 11:24 AM2023-02-01T11:24:21+5:302023-02-01T11:24:42+5:30

पाकिस्तान सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. डाळ, तांदुळ, पीठांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. कोरोना महामारी तसेच रशिया-युक्रेन युद्ध याचाही परिणाम जगाच्या अर्थव्यवस्थेवर झाला आहे.

pakistan pakistan people reaction on why is india growing so fast sana amjad youtube chanel | VIDEO : "मोठा भाऊ हा मोठा भाऊच असतो!" भारताची प्रगती पाहून पाकिस्तानी म्हणाले, देश पॉवरफुल...;

VIDEO : "मोठा भाऊ हा मोठा भाऊच असतो!" भारताची प्रगती पाहून पाकिस्तानी म्हणाले, देश पॉवरफुल...;

googlenewsNext

पाकिस्तान सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. डाळ, तांदुळ, पीठांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. कोरोना महामारी तसेच रशिया-युक्रेन युद्ध याचाही परिणाम जगाच्या अर्थव्यवस्थेवर झाला आहे. पण, या संकटातही भारतातील अर्थव्यवस्था डगमगलेली नाही. आयएमएफनेही याचे संकेत दिले आहे. पण, भारता शेजारील देशांची अर्थव्यवस्था ढासळली आहे, यात श्रीलंका, पाकिस्तानसारख्या देशांची अवस्था बिकट झाली आहे. जगभरात मंदी सावट आहे. पण, भारत प्रगतीत पुढे आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी नागरिक भारताचे कौतुक करत आहेत, आणि भारताला आपला मोठा भाऊ मानत आहेत. एवढेच नाही तर पाकिस्तानी जनतेनेही पाकिस्तानी राज्यकर्त्यांवर टीका केली. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

किंबहुना भारताची प्रगती आणि पाकिस्तानची गरिबी पाहून पाकिस्तानी नागरीकांनाही पश्चाताप होत आहे. पाकिस्तानी लोकांची वाईट अवस्था पाहून पाकिस्तानी जनतेने बडा भाई, बडा भाई होता है असे उघडपणे म्हटले आहे. पाकिस्तान आपल्या अहंकारामुळे भारताकडून मदत घेत नाही. पाकिस्तानची भारताशी स्पर्धा नाही, कारण भारत खूप पुढे गेला आहे, असंही  पाकिस्तानी बोलत आहेत. पाकिस्तानचे भारतासोबतचे संबंध चांगले राहिले असते तर आज पाकिस्तानची अशी अवस्था झाली नसती, असंही पाकिस्तानी जनतेवने म्हटले आहे.

Pakistan vs Bangladesh: आज बांग्लादेश कुठे अन् पाकिस्तान कुठे? 1971 ला भारताने वेगळा केला नसता तर...

सना अमजद नावाच्या यूट्यूब चॅनलवर भारताबाबत पाकिस्तानी नागरिकांच्या प्रतिक्रिया आहेत. यात  त्यांनी भारताचे जोरदार कौतुक केले. आबिद अली नावाच्या पाकिस्तानी नागरिकांने सांगितले की, भारताचे शक्तिशाली देशांशी संबंध आहेत. त्यांची अर्थव्यवस्था सतत वाढत आहे. भारतासोबत आमचे संबंध चांगले असते तर भारत आम्हाला कर्ज देईल, ज्या प्रकारे चीन आणि सौदी आम्हाला मदत करतात. पण आपल्या खोट्या अहंकारामुळे वैर आहे. भारत खूप शक्तिशाली आहे, तो आपल्यापेक्षा खूप पुढे आहे, असंही त्याने म्हटले आहे.

'भारत आपल्यापेक्षा खूप पुढे आहे. ते लोक कष्ट करत आहेत, आम्ही धर्मातून बाहेर पडू शकलो नाही, भारत आणि पाकिस्तान का वेगळे झाले याचा विचार करत आहोत. तिकडे चिकन दीडशे रुपये किलो आहे, मग आमचा काय दोष सांगा. आपण आपला अहंकार वेगळा केला पाहिजे. मोठा भाऊ मोठा असतो. भारत आपल्यापेक्षा खूप मोठा आहे, हे सत्य स्वीकारा. आताही निर्णय घेतला नाही तर कधी घेणार, असंही यात म्हटले आहे.

'सर्व कंपन्यांची प्रॉडक्शन हाऊस भारतात आहेत. जगाला वाटतं की भारतात एवढी मोठी बाजारपेठ आहे, पाकिस्तानात कंपन्या येत नाहीत. कारण सगळेच तोंड उघडून बसलेत की आम्हाला एवढे द्या. बांगलादेश आपल्यापेक्षा पुढे गेला आहे. आमची शर्यत आता अफगाणिस्तान आणि बांगलादेशची आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध होणार नाही, असंही तो नागरिक म्हणाला.

Web Title: pakistan pakistan people reaction on why is india growing so fast sana amjad youtube chanel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.