Pakistan: भारताशी युद्ध होण्याची पाक पंतप्रधानांना भीती

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2023 08:53 AM2023-04-22T08:53:20+5:302023-04-22T08:53:41+5:30

Pakistan: पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना भारताबरोबर युद्ध होण्याची भीती सतावत आहे. त्यामुळे त्यांचे सरकार पंजाब प्रांतामध्ये असेंब्लीच्या निवडणुका घेण्यास तयार नाही. तसे कारण शरीफ सरकारने सर्वोच्च न्यायालयाला दिले आहे.

Pakistan: Pakistan Prime Minister fears war with India | Pakistan: भारताशी युद्ध होण्याची पाक पंतप्रधानांना भीती

Pakistan: भारताशी युद्ध होण्याची पाक पंतप्रधानांना भीती

googlenewsNext

इस्लामाबाद : पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना भारताबरोबर युद्ध होण्याची भीती सतावत आहे. त्यामुळे त्यांचे सरकार पंजाब प्रांतामध्ये असेंब्लीच्या निवडणुका घेण्यास तयार नाही. तसे कारण शरीफ सरकारने सर्वोच्च न्यायालयाला दिले आहे.
पंजाबमध्ये असेंब्लीच्या निवडणुका उशिरा होण्याची काही कारणे शरीफ सरकारने न्यायालयाला सादर केली आहेत. त्या निवडणुका घेण्यास उशीर झाल्याबद्दल दाखल झालेल्या अपीलांवर पाकिस्तानातील सर्वोच्च न्यायालयात सध्या सुनावणी सुरू आहे. यासंदर्भात पाकिस्तान सरकारने सर्वोच्च न्यायालयाला एक अहवाल सादर केला. त्यात म्हटले आहे की, राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या पंजाब प्रांतामध्ये सध्याच्या काळात निवडणुका घेतल्यामुळे पाकिस्तानात राजकीय अस्थिरता वाढू शकते.
 

Web Title: Pakistan: Pakistan Prime Minister fears war with India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.