मगरीनं जिवंत बकरी खाल्ली; गावकऱ्यांनी घेतला भयानक बदला, घटनेची पंचक्रोशीत चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2022 10:53 AM2022-02-10T10:53:37+5:302022-02-10T10:53:58+5:30

मगरीनं जिवंत बकरी मारून खाल्ल्यानं ग्रामस्थ संतापले

pakistan peoples gave heart wrenching punishment to crocodile killing him with axe | मगरीनं जिवंत बकरी खाल्ली; गावकऱ्यांनी घेतला भयानक बदला, घटनेची पंचक्रोशीत चर्चा

मगरीनं जिवंत बकरी खाल्ली; गावकऱ्यांनी घेतला भयानक बदला, घटनेची पंचक्रोशीत चर्चा

Next

पाकिस्तानात एक धक्कादायक घटना घडली आहे. सिंध प्रांतातील ग्रामीण भागात एका मगरीची हत्या करण्यात आली आहे. ग्रामस्थांनी मगरीला कुऱ्हाडीचे वार करून ठार केलं. गावातील एक बकरी मगरीनं खाल्ल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. सध्या ही घटना सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. 

पाकिस्तानी माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, सिंध भागातील काही ग्रामस्थांनी मगरीची कुऱ्हाडीचे वार करून हत्या केली. त्यानंतर मगरीला घेऊन तिची विक्री करण्यासाठी ग्रामस्थ दुसऱ्या गावात घेऊन गेले. मगरीनं आपल्या बकरीला जिवंत खाल्ल्याचा दावा ग्रामस्थांनी केला. मात्र काही ग्रामस्थांनी दिलेली माहिती वेगळी आहे. परिसरात मगरींची संख्या जास्त आहे. मात्र त्या कधीही जनावरं किंवा माणसांवर हल्ला करत नसल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं.

मगरीनं आमच्या बकरीला मारलं. त्यामुळे आम्ही मगरीला कुऱ्हाडीनं हल्ला करून मारून टाकलं, असं एका ग्रामस्थ पाकिस्तानी वृत्तपत्र द एक्स्प्रेस ट्रिब्यूनला सांगितलं. या घटनेचा एक व्हिडीओदेखील समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये ग्रामस्थ मगरीला दोरीनं बांधून दुसऱ्या गावात विक्रीसाठी नेताना दिसत आहेत. 

मारण्यात आलेल्या मगरीची दुसऱ्या गावात नेऊन विक्री करण्यात येईल. तिथे वास्तव्यास असलेली एक व्यक्ती आम्हाला या बदल्यात बक्षीस देईल, असं मृत मगरीला नेणाऱ्या ग्रामस्थानं सांगितलं. सिंध वन्यजीव विभागाकडून योग्य खबरदारी घेत जात नसल्यानं, कारवाई होत नसल्यानं वन्य प्राण्यांच्या हत्या वाढत असल्याचं स्थानिक पत्रकारांनी सांगितलं.
 

Web Title: pakistan peoples gave heart wrenching punishment to crocodile killing him with axe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.