पाकिस्तान - पेशावर शाळा दहशतवादी हल्ल्याचा मास्टमाइंड ड्रोन हल्ल्यात मृत्युमुखी

By admin | Published: July 12, 2016 11:43 AM2016-07-12T11:43:49+5:302016-07-12T12:05:47+5:30

पेशावरमधील लष्करी शाळेवर दहशतवादी हल्ला घडवून आणणा-या मास्टरमाइंड उमर मन्सूरचा अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात मृत्यू झाला आहे

Pakistan - Peshawar school killed in terrorist attack in Mustinde drone attack | पाकिस्तान - पेशावर शाळा दहशतवादी हल्ल्याचा मास्टमाइंड ड्रोन हल्ल्यात मृत्युमुखी

पाकिस्तान - पेशावर शाळा दहशतवादी हल्ल्याचा मास्टमाइंड ड्रोन हल्ल्यात मृत्युमुखी

Next
>ऑनलाइन लोकमत - 
इस्लामाबाद, दि. 12 - पेशावरमधील लष्करी शाळेवर दहशतवादी हल्ला घडवून आणणा-या मास्टरमाइंडचा अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात मृत्यू झाला आहे. अफगाणिस्तानमधील नानगरहर प्रांतात अमेरिकेने ड्रोन हल्ला केला होता, या हल्ल्यात पेशावर दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड उमर मन्सूर याचा मृत्यू झाला आहे. उमर मन्सूरसोबत अजून एक दहशतवादी कारी सैफुल्लाह याचाही मृत्यू झाला आहे. पाकिस्तानच्या एका वरिष्ठ अधिका-याने डॉन वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली आहे. 
 
डिसेंबर २०१४ मध्ये पाकिस्तानच्या वायव्य सरहद्दीतील पेशावर येथील लष्करी शाळेत भीषण दहशतवादी करण्यात आला होता. उमर मन्सूरचा आणि आत्मघाती हल्लेखोरांचा प्रमुख असलेल्या कारी सैफुल्लाहचा मृत्यू झाल्याची आमची खात्रीलायक माहिती आहे असं अधिका-याने सांगितलं आहे. 
 
(१३२ विद्यार्थ्यांचा जीव गेल्यानंतर पेशावरमधील 'थरार' संपला)
 
तालिबानी दहशतवाद्यांनी पेशावरमधील एका लष्करी शाळेवर आत्मघातकी हल्ला चढवला होता.  या हल्ल्यात 144 जणांचा मृत्यू झाला होता. यात 122 शाळकरी मुलं आणि 22 कर्मचार्‍यांना ठार करण्यात आलं होतं. शाळेत घुसलेल्या नऊही अतिरेक्यांना ठार मारण्यात पाक लष्काराला यश आलं होतं. या हल्ल्याची जबाबदारी तहरिक-ए-तालिबान संघटनेनं घेतली होती.
 
(पाकिस्तानमधील टॉप 6 दहशतवादी संघटना)
 
25 मे रोजी अमेरिकेने उमर मन्सूरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले होते. अफगाण तालिबानचा प्रमुख अख्तर मन्सूरचा 21 मे रोजी बलुचिस्तानमध्ये ड्रोन हल्ल्यात मृत्यू झाल्याच्या 4 दिवसानंतर अमेरिकेने ही घोषणा केली होती.  
अफगाणिस्तानमधील खायबर आदिवासी पट्ट्यात दहशतवादी कारवाया करण्याच्या हेतूने उमर मन्सूरने आपलं बस्तान अफगाणिस्तानला हलवलं होतं. पेशावरमधील एअर बेसवर हल्ला करण्यामागेही उमर मन्सूरचा हात होता. या हल्ल्यात 29 जणांचा मृत्यू झाला होता. 20 जानेवारी, 2016 रोजी पाकिस्तानमधील बाचा खान विद्यापीठामध्ये झालेल्या हल्ल्यामागेही उमर मन्सूरच होता.
कोण आहे ही तहरीक-ए-तालिबान संघटना?
– पाकिस्तानातल्या वायव्य सरहद्द प्रांतात या अतिरेकी संघटनेचे केंद्र आहे
– 2007 मध्ये जहाल विचारांच्या 13 गटांनी एकत्र तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानची स्थापना केली
– 2008 मध्ये या अतिरेकी संघटनेवर पाकिस्तान सरकारनं बंदी घातली
 
पश्‍तो शब्द तालिबनपासून तालिबान हा शब्द बनला आहे. त्याचा अर्थ विद्यार्थी असा होतो. तालिबान अफगाणिस्तानमधील कट्टर इस्लामी राजकीय आंदोलन आहे. ती 1996 ते 2001 पर्यंत अफगाणिस्तानमध्‍ये सत्तेत होते.  9/11 हल्ल्यानंतर अमेरिकेने अफगाणिस्तानवर हल्ला करुन तालिबानला सत्तेवरुन पाय उतार केले. सत्तेत असताना त्यांनी कट्टर शरिया कायदे लागू केले होते. 16 डिसेंबर, 2014 रोजी पेशावरमधील लष्‍करी शाळेवर हल्ला करुन टीटीपी प्रकाशझोतात आली होती. या हल्ल्यात 144 निष्‍पाप लोकांनी आपला जीव गमावला होता. यानंतर पाकिस्तान सरकारने या संघटनेच्या दहशतवाद्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे.
 

Web Title: Pakistan - Peshawar school killed in terrorist attack in Mustinde drone attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.