India vs Pakistan: जगात भारताला बदनाम करण्यासाठी पाकिस्तानचं भलतचं प्लॅनिंग; २७ ऑक्टोबरला खेळणार रडीचा डाव
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2021 03:40 PM2021-10-26T15:40:29+5:302021-10-26T15:43:39+5:30
भारताविरोधीत या कार्यक्रमासाठी पाकिस्तानने(Pakistan) अलीकडेच काश्मीरमध्ये एका सेलची मिटींग बोलावली होती
नवी दिल्ली – जगभरात भारताला(India) बदनाम करण्यासाठी पाकिस्तान मोठा कट रचत असल्याचा खुलासा झाला आहे. भारताविरुद्ध काश्मीरबाबत खोटं पसरवण्याचा आरोप करत पाकिस्ताननं जगातील सर्व देशातील हाय कमिशन आणि दूतावासांना कामाला लावलं आहे. पाकिस्तानने २७ ऑक्टोबर रोजी अमेरिकेसह युरोपातील अनेक देशात भारताविरुद्ध प्रदर्शन आणि सेमिनार आयोजित करण्याचं प्लॅनिंग रचलं आहे अशी माहिती कागदपत्रातून समोर आली आहे.
भारताविरोधीत या कार्यक्रमासाठी पाकिस्तानने(Pakistan) अलीकडेच काश्मीरमध्ये एका सेलची मिटींग बोलावली होती. ज्यात पाकिस्तानची जगभरात भारताला बदनाम करण्यासाठी गुप्तचर यंत्रणा ISI च्या अधिकारी आणि परराष्ट्र विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत प्लॅनिंग यशस्वी करण्यासाठी अनेक रणनीतींवर चर्चा करण्यात आली. पाकिस्तान दरवर्षी २७ ऑक्टोबरला काश्मीर ब्लॅक डे म्हणून साजरा करतो.
काय आहे पाकिस्तानचं प्लॅनिंग?
पाकिस्तानने सर्व दूतावासांना फॅक्सद्वारे मेसेज पाठवून २७ ऑक्टोबरला होणाऱ्या कार्यक्रमांची यादी मागवली आहे. त्याचसोबत या कार्यक्रमासाठी खास फंडची व्यवस्था केली आहे. या सर्व देशात काश्मीरवर(Kashmir) वेबिनार आणि इवेंट आयोजित करण्यात येणार आहे. ज्यात भारतीय सुरक्षा यंत्रणांविरोधात बनावट मानवाधिकार उल्लंघन करणाऱ्या गोष्टीवर भाष्य करण्यात येणार आहे. सर्व आंदोलनकर्त्यांना त्या देशाच्या मीडियाचं कव्हेरज मिळावं यासाठीही विशेष प्लॅनिंग केले आहे. हे धरणं आंदोलन यशस्वी बनवण्यासाठी इस्लामाबादमधून सर्व पाक दूतावासांना फंडही पाठवण्यात आला आहे.
सोशल मीडिया आर्मीला पाकने कामाला लावलं
त्याचसोबत सोशल मीडिया ट्विटर, फेसबुक आणि Whatsapp चा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. काश्मीरबाबत ट्विटरवर पाकिस्तानी ISI हॅशटॅग वापरण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यात पाकिस्तानी सोशल मीडिया आर्मीला कामाला लावलं आहे. पाकिस्तान या कार्यक्रमाला काश्मीर फुटिरतावादींना निमंत्रित करणार आहे जे सामान्य जनतेचा आवाज असल्याचं भासवलं जाईल.
यावर्षी १ फेब्रुवारीला एक फॅक्स पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकेतील न्यूयॉर्क स्थित जनरल ऑफिसमध्ये पाठवला होता. ज्यात Kashmir Solidarity Day यशस्वी करण्यासाठी पाकिस्तानी अमेरिका कम्युनिटीच्या मदतीने कँडल विजिल प्रोटेस्ट करण्यास सांगितले होते. न्यूयॉर्कच्या सर्व टॅक्सी आणि ट्रकवर भारताविरोधात जाहिरात कॅम्पेन करण्याचे आदेश होते.