US नं फक्त 'भाड्याच्या बंदुकी'सारखा वापर केला; अमेरिकेच्या 'त्या' वक्तव्यावर इम्रान खान म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2021 06:00 PM2021-09-16T18:00:25+5:302021-09-16T18:01:09+5:30
पंतप्रधान इम्रान खान पुढे म्हणाले, प्रश्न असा आहे की, पाकिस्तान तालिबानवर कारवाई करण्याच्या स्थितीत होता? तेही, जेव्हा पाकिस्तानमध्येच तालिबानी हल्ले होत आहेत.
इस्लामाबाद - अमेरिकेची दहशतवादाविरोधी लढाई ही पाकिस्तानसाठी विनाशकारी ठरली. अफगाणिस्तानातील 20 वर्षांच्या उपस्थितीत वॉशिंग्टनने इस्लामाबादचा वापर केवळ 'भाड्याच्या बंदुकी'सारखाच केला. आम्ही भाड्याने घेतलेल्या बंदुकीसारखे होतो. आम्ही त्यांना (अमेरिका) अफगाणिस्तानातील युद्ध जिंकण्यास मदत करावी, अशी आशा केली जात होती, असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटले आहे. ते एका मुलाखतीत बोलत होते. (Pakistan PM Imran khan said America used islamabad like a hired gun during their 20 year presence in Afghanistan)
अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटी ब्लिंकन यांनी नुकतेच म्हटले आहे की, अफगाणिस्तानातून सैन्य मागे घेतल्यानंतर, अमेरिकेने पाकिस्तानसोबतच्या संबंधांची पुन्हा एकदा समीक्षा करणे आवश्यक आहे. पाकिस्तानचे तालिबान आणि इतर दहशतवादी संघटनांशी घनिष्ठ संबंध आहेत. असेही म्हटले गेले आहे की, जेव्हा अमेरिका अफगाणिस्तानात दहशतवाद विरोधात लढाई लढत होता, तेव्हा पाकिस्तान या दहशतवाद्यांना मदत करत होता. यासंदर्भात पुरावेही समोर आले आहेत.
अमेरिका-इंग्लंडच्या मदतीनं ऑस्ट्रेलिया तयार करतोय आण्विक पाणबुड्या, चीनला फुटला घाम
अमेरिकेने पाकिस्तानवर टीका केलेल्यानंतर, आता इम्रान खान यांनी सीएनएनला दिलेल्या मुलाखतीत दहशतवाद्यांना मदत आणि सुरक्षा पुरविण्याचे आरोप फेटाळले आहेत. इम्रान खान म्हणाले, हे 'सेफ हेवेन्स' काय आहे? अमेरिकेचे ड्रोन सातत्याने पाकिस्तानला लागून असलेल्या अफगाणिस्तानच्या सीमेजवळ लक्ष ठेवून असतात. जर तेथे दहशतवाद्यांना सुरक्षा दिली गेली असती, तर त्यांना निश्चितपणे माहिती मिळाली असती.'
पंतप्रधान इम्रान खान पुढे म्हणाले, प्रश्न असा आहे की, पाकिस्तान तालिबानवर कारवाई करण्याच्या स्थितीत होता? तेही, जेव्हा पाकिस्तानमध्येच तालिबानी हल्ले होत आहेत. मात्र, एकिकडे असे भाष्य करत असतानाच, इम्रान खान आंतरराष्ट्रीय समुदायाला अफगाणिस्तानातील नव्या काळजीवाहू सरकारवर विश्वास ठेवण्याचे आवाहनही करत आहेत.