Imran Khan : इस्लामसंदर्भात पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची मोठी घोषणा; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 06:56 PM2021-10-11T18:56:18+5:302021-10-11T18:58:47+5:30

या कार्यक्रमाशी संबंधित विद्वान, प्रेषित मुहम्मदांची पवित्र शिकवण मुलांपर्यंत आणि तरुणांपर्यंत कशा प्रकारे पोहोचविली जाऊ शकते आणि ही शिकवण तरुणांच्या जीवनात कशा प्रकारे प्रासंगिक बनवली जाऊ शकते, यावर रिसर्च करतील.

Pakistan PM Imran khan talks about moral standards for a better society | Imran Khan : इस्लामसंदर्भात पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची मोठी घोषणा; म्हणाले...

Imran Khan : इस्लामसंदर्भात पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची मोठी घोषणा; म्हणाले...

googlenewsNext

देशाला प्रगती करायची असेल तर समाजाला नैतिकतेचा स्तर वाढवावा लागेल, असे पाकिस्तानचे (Pakistan) पंतप्रधान इम्रान खान (PM Imran khan) यांनी म्हटले आहे. एवढेच नाही, तर त्यांनी रविवारी रहमतुल-इल-अलामीन अथॉरिटीची स्थापन करण्याची घोषणाही केली. इम्रान म्हणाले, या अथॉरिटीचा उद्देश इस्लामची खरी प्रतिमा जगासमोर ठेवणे आणि पैगंबरांची शिकवण जगभर पसरवणे असा असेल. याशिवाय, आपल्या भाषणात त्यांनी पाश्चिमात्य सभ्यतेचा पाकिस्तानी समाजावर होणारा परिणाम आणि चीनच्या भ्रष्टाचारविरोधी धोरणासंदर्भातही भाष्य केले. (Pakistan PM Imran khan)

जनतेला इस्लामचा खरा अर्थ समजावणे हे या अथॉरिटीचे काम असेल -
आशरा-ए-रहमतुल-इल-अलामीन परिषदेला संबोधित करताना इम्रान म्हणाले, या प्रशासनात अनेक स्कॉलर्सचाही समावेश असेल. जनतेला इस्लामचा खरा अर्थ समजावणे हे या अथॉरिटीचे काम असेल. तसेच, या कार्यक्रमाशी संबंधित विद्वान, प्रेषित मुहम्मदांची पवित्र शिकवण मुलांपर्यंत आणि तरुणांपर्यंत कशा प्रकारे पोहोचविली जाऊ शकते आणि ही शिकवण तरुणांच्या जीवनात कशा प्रकारे प्रासंगिक बनवली जाऊ शकते, यावर रिसर्च करतील. एवढेच नाही, तर मुलांना शाळेत काय शिकवले जावे? हेही हेच विद्वान ठरवतील. तसेच, शैक्षणिक संस्थांमध्ये इतर धर्मही शिकवले जातील, असेही इम्रान खान म्हणाले.

पाश्चात्य सभ्यता आपल्या कुटुंब पद्धतीवर परिणाम करत आहे -
​​​​​​​इम्रान खान म्हणाले, हे प्रशासन विद्यापीठांमध्ये वेगवेगळे संशोधनही करेल. यामुळे पाकिस्तानी समाजाला पाश्चात्य संस्कृतीचे फायदे आणि तोटे यासंदर्भातही माहिती मिळेल. यासंदर्भात बोलताना पुढे इम्रान म्हणाले, जेव्हा आपण आपल्या देशात पाश्चिमात्य संस्कृती आणता, तेव्हा तिच्या फायद्यासंदर्भात आणि तोट्यासंदर्भातही चर्चा करणे आवश्यक आहे. मला मान्य आहे, की पाश्चात्य समाजात आपल्यापेक्षाही चांगली नैतिकता आहे. पण हेही खरे आहे, की पाश्चात्य सभ्यता आपल्या कुटुंब पद्धतीवर परिणाम करत आहे आणि आपण त्यासंदर्भात कुठलेही संशोधन केलेले नाही. हे संशोधन पाकिस्तानमध्ये प्रथमच होत आहे.

Web Title: Pakistan PM Imran khan talks about moral standards for a better society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.