Video : भूगोलच नाही, तर इम्रान खान यांचं गणितही कच्चं; म्हणाले, 'भारताची लोकसंख्या १ अब्ज ३०० कोटी'
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2021 08:37 AM2021-08-02T08:37:21+5:302021-08-02T08:38:31+5:30
Pakistan PM Imran Khan : इम्रान खान यांनी भारताची लोकसंख्या १ अब्ज ३०० कोटी असल्याचं म्हटलं. यापूर्वी जपान आणि जर्मनीही शेजारी देश असल्याचं केलं होतं वक्तव्य.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर पुन्हा एकदा सामान्य ज्ञानावरून टीका होताना दिसत आहे. पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी आपल्या जनतेला संबोधित केलं. यावेळी बोलताना त्यांनी भारताची लोकसंख्या १ अब्ज ३०० कोटी असल्याचं वक्तव्य केलं. एवढंच नाही, तर आकडेवारीबाबत बोलताना त्यांना नीटही बोलता आलं नाही. यापूर्वीही त्यांच्या सामान्य ज्ञानावरून त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. त्यांनी तेहरानमध्ये जापान आणि जर्मनी आपले शेजारी देश असल्याचं म्हटलं होतं. तसंच त्यांनी चीन हा पाकिस्तानचा शेजारी देश असल्याबाबतही नकार दिला होता.
इम्रान खान यांच्या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर त्यांची क्लिप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये त्यांनी क्रिकेटमध्ये दोन वर्ल्ड कप असल्याचंही म्हटलं. त्यापैकी एक म्हणजे टेस्ट क्रिकेट आणि दुसरा म्हणजे वनडे क्रिकेट असंही ते म्हणाले, यानंतर जून महिन्यात झालेल्या आयसीसी टेस्ट क्रिकेट चॅम्पिअनशीबाबत न्यूझीलंडची वाहवा करताना न्यूझीलंडची लोकसंख्या चाळीस पन्नास लाख, तर भारताची लोकसंख्या १ अब्ज ३०० कोटी असल्याचं सांगत त्यांनी भारताला टेस्ट चॅम्पिअनशीपमध्ये पराभूत केल्याचं म्हटलं.
India’s population is one billion and 300 crore- Pakistani Prime Minister Imran Khan
— Shama Junejo (@ShamaJunejo) August 1, 2021
pic.twitter.com/oP0G9O9kh4
जपान, जर्मनी शेजारी देश
यापूर्वी २०१९ मध्ये इम्रान खान यांनी इराणचा दौरा केला होता. त्यावेळी पत्रकारांसमोर बोलताना जापान आणि जर्मनी ही पाकिस्तानची शेजारी राष्ट्र असल्याचं म्हटलं होतं. भौगोलिक दृष्ट्या जपान आणि जर्मनी एकमेकांपासून हजारो किलोमीटर दूर आहेत. "जपान आणि जर्मनीनं एकमेकांच्या देशात नरसंहार केल्यानंतर करार केला होता. त्यामुळेच दोन्ही देशांमध्ये व्यापार अधिक उत्तम आहे," असं ते म्हणाले होतं. जून २०२१ मध्ये एका मुलाखतीत बोलताना चीन हा पाकिस्तानचा शेजारी देश असल्याचं इम्रान खान यांनी मानलं नव्हतं. "जे देश आमच्या सीमेला लागून आहेत त्याबाबत मी अधिक चिंतीत आहे," असं ते म्हणाले होते. दरम्यान, चीनचा शिंजियांग प्रांत हा पाकिस्तानच्या सीमेवरच आहे.