Pakistan Political Crisis: इम्रान खान देशातील जनतेला संबोधित करणार, फवाद चौधरी यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 03:38 PM2022-03-31T15:38:29+5:302022-03-31T15:39:43+5:30

Pakistan Political Crisis: इम्रान खान सरकारचे मंत्री फवाद चौधरी (Fawad Chaudhary) यांनी ट्विट करून ही माहिती दिली.

pakistan pm imran khan will address nation tonight minister fawad chaudhary gave information | Pakistan Political Crisis: इम्रान खान देशातील जनतेला संबोधित करणार, फवाद चौधरी यांची माहिती

Pakistan Political Crisis: इम्रान खान देशातील जनतेला संबोधित करणार, फवाद चौधरी यांची माहिती

Next

इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये राजकीय वातावरण तापले आहे. पंतप्रधान इम्रान खान  (Imran Khan) यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्तावावर आजपासून चर्चा सुरू होत आहे, त्यानंतर ते आपली खुर्ची वाचवू शकतील की नाही, याचा निर्णय होणार आहे. इम्रान सरकारवरील संकट संपूर्ण जगासाठी चर्चेचा विषय बनले असून सर्वांच्या नजरा त्यावर खिळल्या आहेत. दरम्यान, इम्रान खान आज रात्री (31 मार्च) देशातील जनतेला संबोधित करू शकतात, अशी बातमी आहे. 

इम्रान खान सरकारचे मंत्री फवाद चौधरी (Fawad Chaudhary) यांनी ट्विट करून ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, पंतप्रधान इम्रान खान आज रात्री देशाला संबोधित करणार आहेत. याआधी इम्रान खान 30 मार्चला देशाला संबोधित करणार होते, मात्र संध्याकाळी ते तसे करणार नसल्याची बातमी आली आणि त्यांनी देशाला संबोधन करणे पुढे ढकलले.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान देशाला संबोधित करणार असल्याची चर्चा बुधवारी दिवसभर पाकिस्तानच्या राजकारणात होती. दरम्यान, पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा आणि आयएसआय प्रमुख इम्रान खान यांच्या घरी पोहोचले आणि त्यांची भेट घेतली. यानंतर संध्याकाळी इम्रान खान यांचे भाषण पुढे ढकलण्यात आल्याची बातमी आली. जनरल कमर जावेद बाजवा यांची भेट घेतल्यानंतरच इम्रान खान यांचे भाषण पुढे ढकलण्याचे प्रकरण समोर आले.आता बाजवा आणि इम्रान यांच्या भेटीचे अनेक अर्थ काढले जात आहेत.

दरम्यान, लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा आणि इम्रान खान यांच्या भेटीबाबत विचारले असता फवाद चौधरी (Fawad Chaudhry) यांनी पत्रकारांना सांगितले की, दोघांमध्ये अशी कोणतीही चर्चा झाली नाही. जनरल बाजवा आणि इम्रान खान यांच्यातील भेटीची पुष्टी करताना पाकिस्तानचे माहिती मंत्री म्हणाले, "लष्कर प्रमुखांनी राजीनामा मागितला नाही आणि ते राजीनामा देणार नाहीत." मात्र, फवाद चौधरी यांनी भेटीबाबत माहिती देण्यास नकार दिला.

अविश्वास प्रस्तावावर आजपासून चर्चा
आज 31 मार्च हा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या राजकीय कारकिर्दीचा शेवटचा दिवस ठरू शकतो, कारण पाकिस्तानच्या संसदेत इम्रान खान यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्तावावर आजपासून चर्चा सुरू होत आहे. हा वाद तीन दिवस चालणार असून 3 एप्रिलला मतदान करण्याचा प्लॅन आहे, मात्र त्यादरम्यान इम्रान खान आपली खिचडी वेगळी शिजवत आहेत.

Web Title: pakistan pm imran khan will address nation tonight minister fawad chaudhary gave information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.