'पुन्हा कर्ज घ्यायला न लागावे...', IMF कडून कर्ज मिळाल्यावर पाकिस्तानची प्रतिक्रिया, चीनवरही केले विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2023 11:29 PM2023-06-30T23:29:38+5:302023-06-30T23:30:32+5:30
गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तान मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तान मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. आता पाकिस्तानला आयएमएफने पाकिस्तानसाठी तीन अब्ज डॉलरच्या बेलआउट पॅकेजसाठी करार केला आहे. या करारामुळे पाकिस्तानचा परकीय चलन साठा मजबूत होण्यास मदत होणार आहे. या संदर्भात आज पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी पत्रकार परिषद घेतली. 'IMF कडून कर्ज घेण्याची ही शेवटची वेळ असावी असे शाहबाज म्हणाले. पुन्हा कर्ज घ्यावे लागेल, अशी परिस्थिती येऊ नये, असंही शाहबाज म्हणाले.
योगी सरकारची अतिक अहमदवर कारवाई! कोट्यवधींची मालमत्ता सरकारी म्हणून घोषित होणार
पीएम शाहबाज शरीफ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, IMF कडून कर्ज घेण्याची ही शेवटची वेळ असावी. पुन्हा कर्ज घ्यावे लागेल, अशी परिस्थिती येऊ नये. आम्ही अनेक वेळा आयएमएफकडे गेलो आहोत. तुर्कीने 2007 नंतर कोणताही करार केला नाही. गेल्या तीन महिन्यांत चीनने पाकिस्तानला डिफॉल्टपासून वाचवले आहे. चीनने पाकिस्तानला सुमारे पाच अब्ज डॉलर्सचे कर्ज दिले आहे.
शरीफ म्हणाले की, मी देवाची शपथ घेतो की आता जगण्याचा हा मार्ग नाही, मी त्यांना भेटलो तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर वाचले की शाहबाज शरीफ आले आहेत. तुम्ही चहा घ्या, आम्हाला माहित आहे की पुढची गोष्ट तुम्हाला कर्जाची आहे. पाकिस्तानातील IMF चे मिशन चीफ नेथन पोर्टर म्हणाले की, IMF आणि पाकिस्तानी अधिकारी यांच्यात नऊ महिन्यांचा स्टँड-बाय करार (SBA) झाला आहे. सुमारे तीन अब्ज डॉलर्स आहे. ही रक्कम 2019 च्या बेलआउट कार्यक्रमाचा भाग आहे.