Imran Khan : "बटाटे-टोमॅटोचे भाव जाणून घेण्यासाठी मी राजकारणात आलेलो नाही तर..."; इम्रान खान संतापले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 01:09 PM2022-03-14T13:09:32+5:302022-03-14T13:21:34+5:30

Imran Khan : महागाई नियंत्रणात आणणे हे सरकारचे प्रमुख काम असल्याचं मानले जात असलं तरी इम्रान खान याला स्पष्ट नकार देत असल्याचे दिसतं आहे. 

pakistan political crisis imran khan says i did not join politics to know prices of aloo tamatar | Imran Khan : "बटाटे-टोमॅटोचे भाव जाणून घेण्यासाठी मी राजकारणात आलेलो नाही तर..."; इम्रान खान संतापले

Imran Khan : "बटाटे-टोमॅटोचे भाव जाणून घेण्यासाठी मी राजकारणात आलेलो नाही तर..."; इम्रान खान संतापले

Next

इस्लामाबाद - पाकिस्तानमध्ये वाढत्या महागाईमुळे (Inflation In Pakistan) जनता हैराण झाली आहे. मैदा, तेल, डाळी, भाजीपाला, गॅस, पेट्रोल-डिझेलचे भाव गगनाला भिडत आहेत. दरम्यान, बटाटे आणि टोमॅटोचे भाव जाणून घेण्यासाठी आपण राजकारणात आलो नसल्याचं पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांनी एका सभेत म्हटलं आहे. अशा परिस्थितीत इम्रान खान यांचे राजकारण करण्याचा नेमका उद्देश काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. महागाई नियंत्रणात आणणे हे सरकारचे प्रमुख काम असल्याचं मानले जात असलं तरी इम्रान खान याला स्पष्ट नकार देत असल्याचे दिसतं आहे. 

बटाटे-टोमॅटोचे दर सांभाळण्यासाठी आपण राजकारणात आलेलो नाही, असं म्हणत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. पंजाब प्रांतातील हाफिजाबाद शहरात एका राजकीय सभेत बोलताना त्यांनी असं म्हटलं आहे. "मी बटाटे आणि टोमॅटोचे भाव जाणून घेण्यासाठी राजकारणात सामील झालो नाही. मी देशाच्या तरुणांच्या फायद्यासाठी सामील झालो. पैशाचा वापर करून कायदे करणाऱ्यांना विकत घेऊन त्यांचे सरकार पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या घटकांच्या विरोधात राष्ट्र उभे राहील" असं देखील इम्रान खान यांनी म्हटलं आहे. 

पाकिस्तानला महान राष्ट्र बनवायचे असेल तर सत्याचे समर्थन केले पाहिजे आणि मी गेल्या 25 वर्षांपासून याचा प्रचार करत आहे असं म्हटलं आहे. तसेच भाषणादरम्यान इम्रान यांनी पंजाबच्या जनतेला वचन दिलं की त्यांचे सरकार प्रांताच्या विकासासाठी काम करेल. पंजाबचा विकास देशाच्या इतिहासात अभूतपूर्व असेल असेही ते म्हणाले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. इम्रान खान यांनी रविवारी भारतावर तोंडसुख घ्यायची संधी सोडली नाही. पंतप्रधान पदाची खूर्ची धोक्यात असताना पुन्हा त्यांनी भारतविरोधी आग ओकण्यास सुरुवात केली. एका रॅलीमध्ये त्यांनी भारताकडून तांत्रिक चुकीमुळे फायर झालेल्या मिसाईलवर भाष्य केले आहे. 

खुर्ची धोक्यात आली तरी इम्रान खान बरळू लागले

भारताची मिसाईल पाकिस्तानात पडली तेव्हा आम्ही देखील त्याचे प्रत्यूत्तर देऊ शकत होतो, परंतू आम्ही संयम ठेवला, अशी शेखी त्यांनी मिरविली आहे. ९ मार्चला हा अपघात झाला होता. भारताचे एक सुपरसॉनिक मिसाईल त्यावर शस्त्रे लादलेली नव्हती, ते देखभाल करताना चुकीने फायर झाले होते. ते पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात पडले होते. लाहोरपासून २७५ किमी दूरवर हे मिसाईल एका कोल्ड स्टोरेजवर कोसळले होते. यामध्ये जीवितहानी झाली नाही.  या घटनेनंतर इम्रान खान गप्पच होते. परंतू आता त्यांच्यावर त्यांच्याच मित्रपक्षांनी आणि विरोधकांनी मिळून अविश्वास प्रस्ताव आणला आहे. यामुळे इम्रान खान पुन्हा रॅली करू लागले आहेत. पाकिस्तानी पंजाबच्या हफिजाबादमध्ये रविवारी त्यांची सभा होती. तेव्हा त्यांनी देशाच्या सुरक्षेवर हे वक्तव्य केले. आपल्याला देशाचे संरक्षण क्षेत्र आणि देशाला मजबूत बनवायचे आहे, असे ते म्हणाले. 

Web Title: pakistan political crisis imran khan says i did not join politics to know prices of aloo tamatar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.