Pakistan: पाकिस्तानात मोठी राजकीय उलथापालथ; पंतप्रधान इमरान खान घेणार महत्त्वाचा निर्णय

By प्रविण मरगळे | Published: March 4, 2021 10:08 PM2021-03-04T22:08:41+5:302021-03-04T22:10:01+5:30

इमरान खान सरकारचे अर्थमंत्री हफीज शेख यांना सीनेटच्या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला, त्यानंतर विरोधी पक्षांनी इमरान खान यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे

Pakistan Politics I am going to take a vote of confidence from the (National) Assembly PM Imran Khan | Pakistan: पाकिस्तानात मोठी राजकीय उलथापालथ; पंतप्रधान इमरान खान घेणार महत्त्वाचा निर्णय

Pakistan: पाकिस्तानात मोठी राजकीय उलथापालथ; पंतप्रधान इमरान खान घेणार महत्त्वाचा निर्णय

googlenewsNext

नवी दिल्ली – पाकिस्तान सेनाप्रमुख जनरल बाजवा यांनी गुरुवारी पंतप्रधान इमरान खान यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली, सरकार आणि सेनेमध्ये सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व प्राप्त झालं आहे, विशेष म्हणजे या मुलाखतीवेळी पाकिस्तानच्या गुप्तचर संस्था आयएसआय प्रमुख लेफ्टनंट जनरल फैज हमीदही पंतप्रधानांच्या बंगल्यावर उपस्थित होते.

या बैठकीच्या नंतर पंतप्रधान इमरान खान यांनी संध्याकाळी ७.३० वाजता पत्रकार परिषद घेतली, यात ते म्हणाले की, सहा वर्षापूर्वी पख्तूनख्वाहमध्ये आमचं सरकार होतं, तेव्हा आम्हाला माहिती पडलं की, सिनेट निवडणुकीसाठी पैसा लागतो, मागील ३०-४० वर्षापासून ते सुरू आहे, जो कोणी सीनेटर बनतो, तो खासदारांना विकत घेण्यासाठी पैशाचा वापर करतो, तेव्हापासून मी याच्याविरोधात लढाई लढत आहे. इमरान खान यांनी विरोधकांवर हल्लाबोल करत म्हटलं की, मी विश्वासदर्शक ठराव आणत आहे, मग मला विरोधी बाकांवर बसावं लागलं किंवा सदनाच्या बाहेर जावं लागलं तरी फरक पडणार नाही, जोपर्यंत ते देशाचा पैसा परत देत नाही तोपर्यंत मी विरोधकांना सोडणार नाही असा इशारा त्यांनी दिला.



 

इमरान खान सरकारचे अर्थमंत्री हफीज शेख यांना सीनेटच्या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला, त्यानंतर विरोधी पक्षांनी इमरान खान यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे, विद्यमान सीनेट अध्यक्ष साजिद संजरानी पुन्हा एकदा सत्ताधारी पक्षाचे उमेदवार म्हणून संसदेच्या अध्यक्षपदासाठी उमेदवार म्हणून निवड झाली आहे, इमरान खान यांनी त्यांची निवड केली आहे, ते विरोधी आघाडीच्या उमेदवाराविरोधात निवडणूक लढवतील.

माहिती जनसंपर्क मंत्री शिबली फराज यांनी गुरुवारी ट्विट करून म्हटलं की, पंतप्रधान इमरान खान यांनी सीनेट अध्यक्षपदासाठी संजरानी यांच्या नावाची घोषणा केली आहे. पाकिस्तानातील वरच्या सभागृहात ३७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी पाकिस्तान तहरिक ए इंसाफ सर्वात मोठी पार्टी बनली आहे, तर पाकिस्तान पीपुल्स पार्टीला दुसऱ्या नंबरवर समाधान मानावं लागलं आहे. इमरान सरकारचे कॅबिनेट मंत्री डॉक्टर शेख यांना पीपीपीच्या तिकीटावर निवडून आलेले माजी पंतप्रधान युसूफ रजा गिलानी यांनी हरवलं आहे, गिलानी यांनी शेख यांना ५ मतांच्या अंतराने पराभूत केलंय, गिलानी यांना १६९ मते मिळाली तर शेख यांना १६४ मते मिळाली आहेत. शेख यांचा पराभव पंतप्रधान इमरान खान यांना मोठा झटका आहे.

Web Title: Pakistan Politics I am going to take a vote of confidence from the (National) Assembly PM Imran Khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.