पाकिस्तान चीनचा मित्र? नाही भंगार खपविण्याचे केंद्र; भारतविरोधी कारवायांसाठी नकली ड्रोन पाठविले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2023 07:25 PM2023-02-09T19:25:20+5:302023-02-09T19:39:00+5:30
पाकिस्तानचा जवळचा मित्र चीन आहे, चीन भारताविरोधात पाकिस्तानला मदत करण्यासाठी लष्करी तंत्रज्ञान पुरवते. नवीन तंत्रज्ञानाच्या आधुनिक शस्त्रांच्या नावाखाली पाकिस्तान लष्कराला बळकट करण्यात व्यस्त आहे.
पाकिस्तानचा जवळचा मित्र चीन आहे, चीन भारताविरोधात पाकिस्तानला मदत करण्यासाठी लष्करी तंत्रज्ञान पुरवते. नवीन तंत्रज्ञानाच्या आधुनिक शस्त्रांच्या नावाखाली पाकिस्तान लष्कराला बळकट करण्यात व्यस्त आहे. काही दिवसापूर्वी चीनने पाकिस्तानला CH-4 UAVs दिली आहेत. एका अहवालानुसार, चीनने पाकिस्तानशी CH-4 चे दोन प्रकार देण्यासाठी करार केला होता, सीएच-4ए, जो गुप्तचर पाळत ठेवण्यासाठी आहे आणि सीएच-4बी, जो एक हल्ला सशस्त्र ड्रोन आहे. त्याचा पुरवठा जानेवारी 2021 पासून सुरू करण्यात आला आहे. पाकिस्तान असे 12 ते 24 ड्रोन घेत आहे, पण ज्याची भीती लष्करी उपकरणांसह चीनकडे कायम आहे, ती भीती आता पाकिस्तानला भेडसावू लागली आहे.
अहवालानुसार, चिनी सीएच-4 ड्रोनला तडे गेल्याचे दिसू लागले आहेत. पाकिस्तानने चीनला ही माहिती दिली आहे. एका UAV मध्ये UAV च्या एक्झॉस्ट मॅनिफोल्डचा डायगोनल ब्रेसिंग सपोर्ट तुटलेला आढळला आहे, तर दुसर्या टर्बो चार्जरच्या स्पॉटला इंजिन माउंटला जोडलेल्या मफलर स्पॉटसह क्रॅक झाल्याचे आढळले आहे. चीनने सशस्त्र ड्रोनसोबत जे एआर-2 एअर टू ग्राउंड मिसाईल दिले आहे, ते चाचणीदरम्यानच चाललेले नाही.
पॉवर-ऑन सेल्फ-चेकच्या चाचणीसाठी जेव्हा पाकिस्तानी हवाई दलाने एआर-2 क्षेपणास्त्र तपासणी उपकरणांसह एकत्रित केले, तेव्हा क्षेपणास्त्राचा शोध घेणारा म्हणजे त्याच्या लक्ष्यावर गोळीबार केल्यानंतर, ते नष्ट करण्याचे तंत्रज्ञान अयशस्वी ठरले. आता ते पाकिस्तानने चीनला परत पाठवले आहे. AR-2 हे कमी पल्ल्याच्या अर्ध-सक्रिय लेझर हवेतून पृष्ठभागावर मारा करणारे क्षेपणास्त्र आहे जे CH-4 ड्रोन तसेच चीनी हल्ला हेलिकॉप्टरमधून डागले जाऊ शकते. याच्या मदतीने सैनिक 8 किलोमीटर अंतरावरुनही चिलखती बंद वाहने, घरे आणि बंकर यांना लक्ष्य करू शकतात. ही समस्या फक्त पाकिस्तानला देण्यात आलेल्या CH-4 ड्रोनची नाही. आधुनिक तंत्रज्ञानाच्या नावाखाली चीनने ज्या देशांना हे ड्रोन विकले ते सर्व देश चिंतेत आहेत. अनेक देशांमध्ये याचा वापरही बंद केला आहे.
अमेरिकेनंतर रशिया दौऱ्यावर भारताचे 'जेम्स बाँड' अजित डोवाल; पुतिन यांची घेतली भेट, चर्चा काय झाली?
चीनने हे ड्रोन सौदी अरेबियालाही विकले होते, मात्र आता ते तांत्रिक बिघाडामुळे पडून आहेत. सौदी अरेबियाच्या हवाई दलाने 2014 मध्ये लाँग रेंज लाँग एन्ड्युरन्स CH-4 UAVs खरेदी केली होती, पण वारंवार तांत्रिक बिघाडांमुळे ते चालत नाहीत. इंटेलिजन्स इनपुटनुसार, सौदी अरेबियाचे हवाई दल चीनकडून सीएच-4 यूएव्ही वापरत होते, पण आता रॉयल सौदी एअर फोर्सने ते सर्व ग्राउंड केले आहेत. तांत्रिक बिघाड किंवा देखभालीअभावी CH-4 ड्रोन जमिनीवर पडण्याची ही पहिलीच वेळ नाही. काही वर्षांपूर्वी, देखभाल आणि तांत्रिक बिघाडामुळे इराकी हवाई दलाला 10 CH-4 ड्रोनचा संपूर्ण ताफा ग्राउंड करावा लागला होता.