नरेंद्र मोदींचे नाव घेताच पाकिस्तानच्या रेल्वेमंत्र्यांना बसला करंट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2019 04:17 PM2019-08-30T16:17:35+5:302019-08-30T16:25:15+5:30
भारत आणि पाकिस्तानचे युद्धाच्या वेळेची घोषणा करणाऱ्या पाकिस्तानचे रेल्वेमंत्री शेख रशीद यांना पंतप्रधान मोदींचे नाव घेताच जोरदार विजेचा झटका बसल्याचे समोर आले आहे.
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तानचे युद्धाच्या वेळेची घोषणा करणाऱ्या पाकिस्तानचे रेल्वेमंत्री शेख रशीद यांना पंतप्रधान मोदींचे नाव घेताच जोरदार विजेचा झटका बसल्याचे समोर आले आहे.
गेल्या काहीदिवसाआधी भारतासोबत युद्ध करण्याची भाषा करणाऱ्या पाकिस्तानचे रेल्वेमंत्री शेख रशीद यांनांच जोरदार विजेचा झटका लागला आहे. पाकिस्तानातील इस्लामाबाद येथील भाषणात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर ते टीकेची झोड उडवत होते. मात्र मोंदीवर टीका करत असतानाच त्यांना माइकद्वारे वीजेचा झटका बसल्याने त्यांनी तात्काळ भाषण थांबविले. त्यानंतर परिस्थिती सांभाळत नरेंद्र मोदी त्यांच्या आक्रोषाला नाकारु शकत नसल्याचे विधान केले.
Sheikh Rasheed k mic mein Modi ne current bhej diya: pic.twitter.com/LsTobPov1q
— Naila Inayat नायला इनायत (@nailainayat) August 30, 2019
जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटविल्यानंतर पाकिस्तान बिथरलेला आहे. त्यामुळे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांचे मंत्री यांच्यात भारताला पोकळ धमक्या देण्यासाठी चढाओढ लागल्याचं पाहायला मिळालं आहे. इम्रान खान यांनी भारताला अण्वस्त्र युद्धाची धमकी दिल्यानंतर पाकिस्तानचे मंत्री शेख रशीद यांनी पुन्हा एकदा युद्धाची भविष्यवाणी करत पाकिस्तानच्या एका न्यूज चॅनेलवर दिलेल्या मुलाखतीत ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या महिन्यात भारत-पाकिस्तान यांच्या युद्ध होण्याची शक्यता असल्याचे वक्तव्य केले होते.
Pakistan media: Railways Minister Sheikh Rashid Ahmed has predicted that a full-blow war between Pakistan and India is “likely to occur in October or the following month.” (file pic) pic.twitter.com/rWnvi8xZqE
— ANI (@ANI) August 28, 2019
त्याचप्रमाणे केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटवल्यानं पाकिस्तान किती सैरभैर झाला आहे, हे आपण रोजच पाहत आहोत. त्यातच त्यांनी गुरुवारी अनेक चाचण्या केलेल्या 'गझनवी' क्षेपणास्त्राची चाचणी त्यांनी पुन्हा एकदा केली. आम्हाला कमी लेखू नका, हे भारत सरकारला, लष्कराला सांगण्याचाच त्यांचा हा प्रयत्न आहे. परंतु, ही धडपड हास्यास्पदच ठरली आहे.