पाकिस्तानच्या रेल्वे मंत्र्यांकडून भारताला पुन्हा अणुबॉम्बची धमकी, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2020 06:18 PM2020-08-20T18:18:12+5:302020-08-20T18:29:53+5:30
गेल्या काही दिवसांपूर्वी शेख रशीद अहमद यांनी नुकतेच अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यावरून सुद्धा विधान केले होते.
आपल्या वादग्रस्त विधानामुळे सतत चर्चेत असलेले पाकिस्तानचे रेल्वेमंत्री शेख रशीद यांनी पुन्हा एकदा भारताविरोधात गरळ ओकली आहे. शेख रशीद अहमद यांनी भारताविरूद्ध अणुबॉम्ब वापरण्याची धमकी दिली आहे. पाकिस्तानजवळ अणुबॉम्ब आहे, त्याची क्षमता आसामपर्यंत पोहोचण्याची आहे. तसेच, या अणुबॉम्ब हल्ल्यांमध्ये मुस्लिमांचे नुकसान होणार नाही, असे शेख रशीद अहमद यांनी म्हटले आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध झाले तर ते रक्तरंजित आणि अंतिम युद्ध असेल. पाकिस्तानने भारतावर हल्ला केला तर ते अणुयुद्ध होईल, असे शेख रशीद अहमद म्हणाले. तसेच, मुस्लिमांचे प्राण वाचवताना आमचे हत्यार त्या भागांना लक्ष्य करू शकते. पाकिस्तान आसामपर्यंत लक्ष्य करू शकते, अशी गरळ शेख रशीद अहमद यांनी ओकली आहे.
शेख रशीद अहमद यांनी पहिल्यांदाच ही धमकी दिली नाही. यापूर्वीही त्यांनी अनेकदा असे विधान केले आहे. याआधी शेख रशीद अहमद यांनी भारताचे नाव न घेता अणु युद्धाची धमकी दिली होती. आता युद्ध पारंपारिक मार्गाने होणार नाही, तर अणु युद्ध होईल, असे शेख रशीद अहमद म्हणाले होते. पाकिस्तानकडे 125 ग्रॅम आणि 250 ग्रॅम वजनाची लक्ष्यभेदी अण्वस्त्रे आहेत, जी एका विशिष्ट लक्ष्यावर मारा करू शकतात, असेही शेख रशीद अहमद यांनी म्हटले होते.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी शेख रशीद अहमद यांनी नुकतेच अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यावरून सुद्धा विधान केले होते. भारत हा आता धर्मनिरपेक्ष देश नाही, तर तो धर्माचा देश बनला आहे, असे विधान शेख रशीद अहमद यांनी केले होते. त्यानंतर शेख रशीद अहमद यांच्या विधानावर भारताने चोख प्रत्युत्तर दिले. दहशत पसरविणारा देश धार्मिक उन्माद वाढविण्यासारखीच विधाने करू शकतो, असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले होते.
आणखी बातम्या...
१००० वर्षांहून अधिक काळ टिकणार अयोध्येतील राम मंदिर, संपूर्ण दगडाने बांधणार
आता पुढचे काही दिवस सामना अग्रलेखाचे विषय 'असे' असतील; नितेश राणेंची खोचक टीका
मोदी सरकारमधील आणखी एका मंत्र्याला कोरोना; गजेंद्रसिंह शेखावत यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह!
जिम पुन्हा सुरू करणे आवश्यक; सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
केंद्र सरकारचा मोठा निर्णय, जम्मू-काश्मीरमधून १० हजार जवानांना माघारी बोलविणार
शत्रूला नकळत लष्कराचे जवान लडाखला पोहोचणार, भारताचा नवा मास्टर प्लॅन
यूपीत पुराव्याशिवाय एन्काऊंटर होतायेत, असदुद्दीन ओवैसींचा योगी सरकारवर निशाणा
'सुशांतच्या कुटुंबीयांना न्याय मिळेल', बिहारच्या मुख्यमंत्र्यांची 'सर्वोच्च' निकालानंतर प्रतिक्रिया