Pakistan Flood : हाहाकार! पाकिस्तानमध्ये पावसाचे थैमान; तब्बल 357 जणांचा मृत्यू, 400 हून अधिक लोक जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2022 03:19 PM2022-07-30T15:19:20+5:302022-07-30T15:31:01+5:30

Pakistan Rain & Flood : गेल्या पाच आठवड्यांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीने 357 जणांचा मृत्यू झाला आहे तर 400 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

Pakistan Rain & Flood heavy rain and flood in pakistan due to monsoon many died and wounded | Pakistan Flood : हाहाकार! पाकिस्तानमध्ये पावसाचे थैमान; तब्बल 357 जणांचा मृत्यू, 400 हून अधिक लोक जखमी

फोटो - सोशल मीडिया

Next

इस्लामाबाद  - पाकिस्तानमध्ये पावसाने थैमान घातले आहे. गेल्या पाच आठवड्यांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीने 357 जणांचा मृत्यू झाला आहे तर 400 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. पाकिस्तानातील राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकरणाने याबाबत माहिती दिली आहे. एनडीएमएच्या अधिकृत सूत्रांनी वृत्तसंस्था शिन्हुआला दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानात 14 जूनपासून मान्सूनचा पाऊस मोठ्या प्रमाणावर पडत आहे. मुसळधार पावसानंतर आलेल्या पुरामुळे जीवितहानी, घरं कोसळणे, रस्ते खचणे अशा प्रकारच्या घटना वाढल्या आहेत.

एनडीएमएच्या आकडेवारीनुसार, 23,792 घरांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. तर, काही घरांचं नुकसान झालं आहे. काही ठिकाणचे पूल वाहून गेले असून दुकानांचं नुकसान झालं. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी देश वातावरणीय बदलांचा सामना करत असल्याचं म्हटलं. तर, देशात निर्माण झालेली पूरस्थिती दूर करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं ते म्हणाले.

बलूचिस्तानमध्ये 106 लोकांचा मृत्यू

पाकिस्तानातील पूरस्थितीमुळं सर्वाधिक मृत्यू बलूचिस्तान प्रांतात झाले आहेत. मुसळधार पाऊस आणि पूरस्थितीसारख्या घटनांमुळं 106 जणांचा मृत्यू झाला आहे. सिंध प्रांतात 90 लोकांचा मृत्यू झाला आहे. एनडीएमएनं दिलेल्या माहितीनुसार पंजाब प्रांतात 76, खैबर पख्तूनख्वामध्ये 70 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, देशातील इतर भागात 15 जणांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानी सैन्यदल आणि स्थानिक प्रशासनाकडून नागरिकांच्या बचावासाठी मदतकार्य सुरू करण्यात आलं आहे.

मुसळधार पावसाने निर्माण झालेल्या स्थितीमुळं पुरस्थिती अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी पाठवण्यात येत आहे. पूरग्रस्तांना जेवण आणि पाणी देण्यात येत आहे. जखमींवर डॉक्टर उपचार करत आहेत. शाहबाज शरीफ यांनी मुसळधार पावसाने निर्माण झालेल्या स्थितीचा आढावा घेण्याचे आदेश दिले आहेत. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: Pakistan Rain & Flood heavy rain and flood in pakistan due to monsoon many died and wounded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.