कुलभूषण जाधवबाबत पाकिस्तान मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2019 02:34 PM2019-11-13T14:34:39+5:302019-11-13T14:35:09+5:30

Kulbhushan Jadhav : पाकिस्तानी तुरुंगात कैद असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्याबाबत मोठा निर्णय घेण्याची तयारी पाकिस्तानने केली आहे.

Pakistan ready for big decision on Kulbhushan Jadhav | कुलभूषण जाधवबाबत पाकिस्तान मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत 

कुलभूषण जाधवबाबत पाकिस्तान मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत 

Next

इस्लामाबाद - पाकिस्तानी तुरुंगात कैद असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्याबाबत मोठा निर्णय घेण्याची तयारी पाकिस्तानने केली आहे. कुलभूषण जाधव यांच्याविरोधात सुरू असलेला खटला लष्करी न्यायालयाऐवजी नागरी न्यायालयात चालवण्यासाठी आर्मी अॅक्टमध्ये बदल करण्याची तयारी पाकिस्तानने सुरू केली आहे. त्यानंतर जाधव यांना त्यांना झालेल्या अटकेविरोधात नागरी न्यायालयात दाद मागावी लागेल. 

 दरम्यान, कुलभूषण जाधव प्रकरणावरून आंतरराष्ट्रीय न्यायालयाने काही दिवसांपूर्वी पाकिस्तानला फटकारले होते. कुलभूषण जाधव यांना देण्यात आलेल्या वागणुकीवरून पाकिस्ताननं व्हिएन्ना कराराचं उल्लंघन केल्याचा ठपका आंतरराष्ट्रीय न्यायालयाने ठेवला आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे न्यायमूर्ती अब्दुलकावी वुसुफ यांनी संयुक्त राष्ट्राच्या महासभेत हे सांगितले होते. कुलभूषण प्रकरणात 17 जुलैला जारी करण्यात आलेल्या आदेशाचा हवाला देत ते म्हणाले की,   पाकिस्तान कुलभूषण प्रकरणात व्हिएन्ना करारांतर्गत येणाऱ्या कलम 36चं उल्लंघन केले आहे. या प्रकरणात त्यांनी योग्य पावले उचलली नसल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे.

193 देशांची सदस्यसंख्या असलेल्या संयुक्त राष्ट्राच्या महासभेत युसूफ म्हणाले, व्हिएन्ना करारानुसार कायदेशीर मदत देणं बंधनकारक आहे, पण पाकिस्ताननं कुलभूषण जाधव यांना तशी मदत दिलेली नाही. पाकिस्ताननं कुलभूषण जाधव यांना हेरगिरी करत असल्याच्या संशयावरून अटक केली होती. परंतु व्हिएन्ना करारात हेरगिरीसाठी वेगळ्या अशा कोणत्याही तरतुदीचा उल्लेख नाही. त्यामुळे पाकिस्ताननं मदत देणं आवश्यक होतं.  
भारतीय नौदलाचे माजी अधिकारी असलेले कुलभूषण जाधव पाकिस्तानच्या तुरुंगामध्ये बंद आहेत. पाकिस्तानचा दावा आहे की, कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणांनी 3 मार्च 2016 रोजी गुप्तहेर आणि दहशतवादी कारवाया या आरोपाखाली अटक केली होती. कुलभूषण जाधव यांना बलुचिस्तान येथून अटक करण्यात आले होते. त्यानंतर पाकिस्तान कोर्टाने जाधव यांना मृत्युदंडाची शिक्षा दिली होती. मात्र या शिक्षेविरोधात भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली होती. 

Web Title: Pakistan ready for big decision on Kulbhushan Jadhav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.