पाकिस्तानने ८६ भारतीय मच्छीमारांना सोडले
By admin | Published: March 20, 2016 09:56 PM2016-03-20T21:56:34+5:302016-03-20T21:56:34+5:30
पाकिस्तानने ८६ भारतीय मच्छीमारांना सोडले आहे. पाकिस्तानी हद्दीमध्ये मासेमारी केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती.
Next
ऑनलाइन लोकमत
कराची, दि. २० - पाकिस्तानने ८६ भारतीय मच्छीमारांना सोडले आहे. पाकिस्तानी हद्दीमध्ये मासेमारी केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. मागील अडीच वर्षांपासून हे मच्छीमार पाकिस्तानी तुरुंगात कैद होते. आज लांधी तुरुंगातून त्यांची सुटका करण्यात आली. लवकरच वाघा सीमेवर ते भारताकडे सुपूर्द केले जातील. भारतासोबतचे द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी पाकिस्तानने आज पुढाकार घेत ८६ भारतीय मच्छीमारांची सुटका केली आहे.
Karachi(Pak): Pak releases 86 Indian fishermen, were arrested for allegedly trespassing into its territorial waters pic.twitter.com/sGOsHU05YI
— ANI (@ANI_news) March 20, 2016