अब की बार महंगाई की मार; पाकिस्तानी रुपया 140 पार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2019 01:03 PM2019-05-16T13:03:54+5:302019-05-16T13:05:11+5:30

पाकिस्तानी रुपयाची ऐतिहासिक घसरण

Pakistan rupee hits all time low after IMF bailout deal | अब की बार महंगाई की मार; पाकिस्तानी रुपया 140 पार

अब की बार महंगाई की मार; पाकिस्तानी रुपया 140 पार

Next

इस्लामाबाद: पाकिस्तानचीअर्थव्यवस्था मोडकळीस आली आहे. पाकिस्तानी रुपयाच्या मूल्यात ऐतिहासिक घसरण झाली आहे. एक डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपयाचं मूल्य 141 वर पोहोचलं आहे. येत्या काही दिवसात पाकिस्तानी रुपया आणखी खाली जाण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे पाकिस्तानात महागाईचा जोर वाढण्याची शक्यता आहे. 

पाकिस्तान भारताप्रमाणेच खनिज तेल आयात करतो. या व्यापारावर घसरत्या रुपयाचा परिणाम दिसू लागला आहे. याशिवाय पाकिस्तान दैनंदिन वापरातल्या अनेक वस्तूदेखील आयात करतो. रुपयाचं मूल्य सातत्यानं कमी होत असल्यानं महागाई वाढत आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं बेलआऊट डील केल्यावर पाकिस्तानी रुपयाच्या मूल्यात ऐतिहासिक घसरण झाली. काल एका डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपया 147 पर्यंत घसरला होता. त्यात आज थोडी सुधारणा झाली. 

पाकिस्तान आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीत झालेल्या करारातील अटी, शर्ती अद्याप समोर आलेल्या नाहीत. त्यामुळे व्यावसायिक आणि गुंतवणूकदार संभ्रमावस्थेत आहेत. त्यामुळे अनेकांनी गुंतवणूक काढून घेण्यास सुरुवात केली आहे. याचा फटका पाकिस्तानी अर्थव्यवस्थेला बसला आहे. काही माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानला येत्या अर्थसंकल्पात वीज आणि गॅसच्या किमती वाढवाव्या लागणार आहेत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसोबत केलेल्या करारात पाकिस्ताननं ही अट मान्य केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 
 

Web Title: Pakistan rupee hits all time low after IMF bailout deal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.