पाक - रशिया पहिल्यांदाच करणार लष्करी संचलन
By admin | Published: September 24, 2016 12:15 AM2016-09-24T00:15:22+5:302016-09-24T00:19:05+5:30
रशिया आणि पाकिस्तान उद्यापासून पहिल्यांदाच संयुक्त लष्करी संचलन करणार आहेत. रशियाच्या जवानांची एक तुकडी पाकिस्तानात शुक्रवारी दाखल झाली
Next
>ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. 23 - रशिया आणि पाकिस्तान उद्यापासून पहिल्यांदाच संयुक्त लष्करी संचलन करणार आहेत.
रशियाच्या जवानांची एक तुकडी पाकिस्तानात शुक्रवारी दाखल झाली असून रशिया आणि पाकिस्तान शनिवारपासून पहिल्यांदाच संयुक्तरित्या संचलन करणार असल्याची माहिती आयएसपीआरचे ले. जनरल असीम सलीम बाज्वा यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.
काही दिवसांपूर्वी जम्मू -काश्मीरमधील उरीमध्ये दहशतवाद्यांकडून भारतीय लष्करी तळावर हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात भारतीय लष्करातील १८ जवान शहीद झाले होते. त्यानंतर रशिया आणि पाकिस्तान यांच्यातील संयुक्त लष्करी सराव रद्द करण्याची माहिती देण्यात आली होती.
रशियाचे 200 जवान या संचलनात भाग घेणार आहेत. या दोन्ही देशांच्या लष्करी संचलनाला 'फ्रेन्डशिप 2016' असे नाव देण्यात आले असून हे संचलन दोन आठवडे म्हणजेच 7 ऑक्टोंबरपर्यंत चालू राहणार असल्याची माहिती पाकिस्तानच्या मिडीयाने दिली आहे.