पाकिस्तानसाठी अणुबॉम्ब बनवला आणि फसला; वैज्ञानिकाची सर्वोच्च न्यायालयात धाव
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2020 04:46 PM2020-05-16T16:46:29+5:302020-05-16T17:10:36+5:30
पाकिस्तानचे अणुबॉम्ब निर्मितीचे जनक म्हणून अब्दुल कादिर खान यांची ओळख आहे.
नवी दिल्ली: पाकिस्तानसाठी २००४ साली अणुबॉम्बची निर्मिती करणारे वैज्ञानिक अब्दुल कादिर खान यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. अब्दुल कादिर खान यांनी पाकिस्तनच्या सरकारवर आरोप केला आहे की, मला स्वातंत्र्यापणे फिरता येत नाही. तसेच मला यासंबंधित तक्रार देखील दाखल करु देत नाही, असा दावा अब्दुल कादिर खान यांनी केला आहे.
अलजजीरा रिपोर्ट्सनूसार, अब्दुल कादिर खान यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, मला स्वातंत्र्यपणे फिरता येत नाही. माझ्यावर सतत नजरकैद ठेवण्यात येत आहे. तसेच कोणालाही भेटण्यास परवानगी दिली जात नसल्याचा आरोप अब्दुल कादिर खान यांनी केला आहे. त्याचप्रमाणे अब्दुल कादिर खान यांनी गेल्या वर्षी देखील याबाबत एक याचिका दाखल केली होती. यावर न्यायालयाने त्यांच्यावर नजरकैद न ठेवण्याचे आदेश दिले होते. मात्र तरीदेखील सरकारकडून नजर ठेवण्यात येत असल्याचे अब्दुल कादिर खान यांनी सांगितले.
पाकिस्तानचे अणुबॉम्ब निर्मितीचे जनक म्हणून अब्दुल कादिर खान यांची ओळख आहे. अणुबॉम्ब प्रसारणाची चर्चा स्वीकारल्यानंतर त्यांना पदावरुन काढून टाकण्यात आले होते. पाकिस्तानने १९९८मध्ये पहिल्या अणुबॉम्बची चाचणी केली होती. अब्दुल कादिर खान यांना पदावरुन हटव्यानंतर देखील सरकारकडून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात पहारा देण्यात येत असल्याचे अलजरीराच्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे.