पाककडून अमेरिकेत 'लॉबिस्ट'चा शोध
By admin | Published: June 28, 2016 06:05 AM2016-06-28T06:05:35+5:302016-06-28T06:05:35+5:30
आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला दोन मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागल्यानंतर, आता पाककडून अमेरिकेत लॉबिस्टचा (प्रचारक) शोध सुरू झाला आहे.
इस्लामाबाद : आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला दोन मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागल्यानंतर, आता पाककडून अमेरिकेत लॉबिस्टचा (प्रचारक) शोध सुरू झाला आहे.
मागील काही दिवसांत घडलेल्या दोन घटना पाकिस्तानला लॉबिस्टचा शोध करण्यास भाग पाडत आहेत. अमेरिकेने पाकला एफ-१६ विमानाच्या व्यवहारात सूट देण्यास नकार दिला, तर भारताच्या एनएसजी सदस्यत्वाबाबत अमेरिकेने भारताला जाहीर पाठिंबा दिला.
अमेरिका व पाक यांच्यात मतभेद वाढले आहेत. अफगाणिस्तानात तालिबानशी कसा संघर्ष करायचा? याबाबतही मतभेद आहेत. अमेरिकेने पाकिस्तानवर आरोप केलेला आहे की, अतिरेकी संघटनांचा नायनाट
करण्यात पाकिस्तान अपयशी ठरला आहे. वॉशिंग्टनस्थित पाक दूतावासाचे प्रवक्ते नदीम होतियाना यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. (वृत्तसंस्था)