पाकिस्तानच्या अडचणी आणखी वाढल्या! IMF कर्ज द्यायला तयार नाही, पाकिस्तानचे पंतप्रधान संतापले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2023 02:20 PM2023-03-01T14:20:57+5:302023-03-01T14:22:18+5:30

गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तान आर्थिक संकटात सापडला आहे. आयएफएमकडून पाकिस्तान आर्थिक मदतीसाठी प्रयत्न करत आहे.  पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमधून IMF टीम फेब्रुवारीमध्ये परतली.

pakistan shehbaz sharif government angry on imf due to loan conditions | पाकिस्तानच्या अडचणी आणखी वाढल्या! IMF कर्ज द्यायला तयार नाही, पाकिस्तानचे पंतप्रधान संतापले

पाकिस्तानच्या अडचणी आणखी वाढल्या! IMF कर्ज द्यायला तयार नाही, पाकिस्तानचे पंतप्रधान संतापले

googlenewsNext

गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तान आर्थिक संकटात सापडला आहे. आयएफएमकडून पाकिस्तान आर्थिक मदतीसाठी प्रयत्न करत आहे. 
पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमधून IMF टीम फेब्रुवारीमध्ये परतली. तेव्हा त्यांनी संकटात सापडलेल्या पाकिस्तानला कर्ज देण्याचे कोणतेही ठोस आश्वासन दिले नव्हते, पण काहीतरी करण्याचा विश्वास नक्कीच व्यक्त केला होता. आयएमएफने यापुढेही चर्चा सुरू ठेवण्याबाबत आणि कर्मचारी स्तरावरील करारावर कर्ज देण्याबाबत बोलले होते. 'आम्ही आयएमएफचे सदस्य देश आहोत, पण आम्हाला भिकाऱ्यासारखी वागणूक दिली जात आहे', असल्याचे वक्तव्य एका पाकिस्तानी अधिकाऱ्याने केले आहे.

पाकिस्तान IMF च्या अटींवर सतत काम करत आहे, पण अद्याप कर्जाचा हप् अजुनही मिळालेला नाही.  आयएमएफच्या कामकाजामुळे पाकिस्तान सरकारचे अधिकारी घाबरले आहेत. त्यांना वाटते की IMF चुकीचे करत आहे आणि कर्ज जारी करण्यासाठी निश्चित केलेल्या 4 अटी देखील बदलल्या आहेत. त्यामुळे पाकिस्तान सरकार थोडे चिंतेत आहे, यावरुन पाकिस्तानने आयएफएमवर टीका केली आहे. 

अमेरिकेच्या सर्वात मोठ्या शत्रूने बनवला अणुबॉम्ब, अवघ्या १२ दिवसांत..., जग चिंतीत

'आम्ही आयएमएफचे सदस्य देश आहोत, तेथे भिकारी नाहीत. तुम्हाला असे वाटत असेल तर आमचे सदस्यत्व रद्द करा.' देशातील परिस्थिती 1998 सारखी झाली आहे, जेव्हा अणुचाचण्यांनंतर आर्थिक संकट अधिक गडद झाले होते. आयएमएफ फक्त असे म्हणत आहे की गरीबांना फायदा होईल अशी धोरणे बनवावीत. पण ते स्वत: अशा धोरणांसाठी आमच्यावर दबाव आणत आहेत, ज्यामुळे कमी उत्पन्न गटातील लोकांचेच नुकसान होईल, अशी माहिती पोकिस्तानी अधिकाऱ्यांनी दिली.

Web Title: pakistan shehbaz sharif government angry on imf due to loan conditions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.